नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत भारतात दररोज अनेकांचा बळी जात आहे. साथीच्या आजारात आतापर्यंत लाखो लोकांनी आपला जीव गमावला. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत बर्‍याच चित्रपट कलाकारांचेही निधन झाले आहे. प्रसिद्ध अभिनेता राहुल वोहरा याचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी त्याने या जगाचा निरोप घेतला. राहुल वोहरा याच्या निधनानंतर आता त्याची पत्नी ज्योती तिवारी हिने पतीच्या मृत्यूसाठी वैद्यकीय दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवला आणि न्यायाची मागणी केली. ज्योती तिवारीने पती राहुल वोहराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


व्हिडिओमध्ये राहुल वोहरा याने रुग्णालयातील दुर्दशा काय आहे याची माहिती दिली. हा व्हिडिओ शेअर करताना ज्योती तिवारीने आपल्या पोस्टमध्ये राहुल वोहराच्या मृत्यूसाठी रुग्णालयाला जबाबदार धरले आहे. राहुल वोहरा याला कोरोनाची लागण झाल्यानंतर दिल्लीच्या ताहिरपूर येथील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते.


ज्योती तिवारी हिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'माझा राहुल गेला आहे, सर्वांना हे माहित आहे, परंतु तो कसा गेला हे कोणालाही माहिती नाही. राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ताहिरपूर दिल्ली. तिथे असेच वागणूक दिली जाते. मला आशा आहे की माझ्या पतीला न्याय मिळेल. अजून एक राहुल हे जग सोडू नये.' ज्योती तिवारीची सोशल मीडियावरील पोस्ट आणि राहुल वोहराचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Jyoti Tiwari (@ijyotitiwari)


राहुल वोहराचे शनिवारी कोरोनामुळे निधन झाले. त्याचे फेसबुकवर खूप फॅन फॉलोव्हिंग होते. आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये त्यांनी चांगले आरोग्य उपचार करण्याचे आवाहन केले. नाट्य दिग्दर्शक आणि नाटककार अरविंद गौर यांनी राहुल वोहराच्या मृत्यूची पुष्टी केली.