मुंबई : हे बऱ्याचदा पाहिलं गेलं आहे की, सामान्य लोकं आपल्या आवडत्या स्टार्ससाठी वेडे असतात. स्टार्स काय घालतात, ते काय खातात, ते कसे राहतात, ते कुठे येतात आणि कुठे जातात याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. आता लोकांनी स्टार्सच्या बेडरूममध्ये डोकावण्यास सुरुवात केली आहे चाहत्यांना स्टार्सच्या सेक्सलाईफबद्दल जाणून घ्यायचं आहे. आता स्टार्स देखील त्यांचं बेडरूमचं रहस्य उघड करण्यात मागे हटत नाहीत आणि या बद्दल मोकळेपणाने ते कायमच सांगतात. अशाच काही स्टार्सचे बेडरूम रहस्य समोर आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिद कपूर हा कंट्रोल फ्रिक आहे
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कपूर भलेही सेलिब्रिटी नसेल, पण ती नेहमीच तिच्या स्पष्ट बोलण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहते. पती-पत्नी म्हणून दोघांची जोडी जितकी गोंडस आहे, तितकेच त्यांचं ट्यूनिंग आश्चर्यकारक आहे. एकदा एका चॅट शोमध्ये शाहिद कपूर पत्नी मीरासह त्या कार्यक्रमाचा भाग बनला. कार्यक्रमाच्या मध्यभागी शाहिदला त्याच्या आवडत्या सेक्स पोझिशनबद्दल विचारण्यात आलं. शाहिद या प्रश्नाला उत्तर देण्यास संकोच करत असतानाच मीराने उत्तर दिलं आणि म्हणाली, "मला वाटतं की माझा पती कंट्रोल फ्रिक आहे. कारण तो मला नेहमी सांगतो की काय करावं."


बेडवर झोपताना करीनाला सैफचा आधार हवा असतो
बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक, करीना कपूर खान आणि सैफ अली खान. करीनाने डिस्कव्हरी प्लसच्या सेलिब्रिटी कुकिंग शोमध्ये एका मुलाखतीदरम्यान तान्या घावरीसोबत तिच्या बेडरूमचे रहस्य उघड केलं आणि म्हणाली की, तिला झोपण्यापूर्वी तीन गोष्टींची गरज असते. आणि या तीन गोष्टी आहेत, 'वाईनची बॉटल, पायजामा आणि सैफ अली खान.' असं म्हणत करीना हसायला लागली. पुढे ती म्हणाली 'मला वाटतं की, हे परिपूर्ण उत्तर आहे आणि माझ्याकडे हॅम्पर आहे.'


शिल्पा शेट्टीची आवडती जॉनर 50 शेड्स ऑफ ग्रे
बीटाउनमधील सर्वात हॉट जोडप्यांपैकी एक शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि राज कुंद्रा यांच्यातील ट्यूनिंग भन्नाट आहे. या दोघांमधील आरामाची पातळी किती उच्च आहे हे सर्वज्ञात आहे. काहि महिन्यांपूर्वी, शिल्पा शेट्टी कुंद्राने इन्स्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिचा पती राज कुंद्रा तिला विचारत आहे 'तुझी आवडती जॉनर कोणता?' हे ऐकून शिल्पा किंचाळते. असं असूनही, राज कुंद्रा थांबत नाही आणि म्हणतो, "ग्रे कलरच्या 50 शेड्स अरे! हे आमचं बेडरूम रहस्य आहे". हे ऐकून शिल्पा शेट्टी लाजत आपला चेहरा लपवते. सध्या राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आहे.


बेडवरुन लवकर उतरुन नाही देत रणवीर सिंग 
चित्रपटसृष्टीतील सर्वात गोड जोड्यांमध्ये गणली जाणारी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग, एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची कोणतीही संधी हे दोघं कधीही सोडत नाहीत. कधीकधी दोघंही विनोदाने एकमेकांचे पाय ओढतात. अॅवॉर्ड शो होस्ट करत असताना, कार्तिक आर्यनने दीपिकाला बेडरूमशी संबंधित प्रश्न विचारला की, ती बेडच्या कोणत्या बाजूने उतरते. यावर दीपिकाने सांगितलं की, ती बेडच्या उजव्या बाजूने खाली उतरते. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या रणवीर सिंगला जेव्हा हाच प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तो हसला आणि म्हणाला, "जेव्हा मी तिला बेडवरुन खाली तेव्हा उतरुन देईन जेव्हा उजवा आणि डावं होईल." यांचे उत्तर ऐकून दीपिका लाजली.


प्रियांकाचा पती निकला सकाळी उठून तिचा चेहरा पाहणं आवडतं.
प्रियंका चोप्रा जोन्सने एकदा पती निक जोन्सच्या एका सवयीबद्दल तिच्या बेडरूमचे रहस्य शेअर केलं. असं सांगण्यात आलं की, निक जेव्हा सकाळी उठतो तेव्हा त्याला आधी प्रियंकाचा चेहरा बघायला आवडतो. मात्र, यामुळे त्यांना थोडा त्रास होतो. कारण प्रियांकाला तिचा चेहरा स्वच्छ केल्यानंतर, क्रीम, लिपस्टिक आणि मस्करा लावल्यानंतर सकाळी थोडे चांगलं दिसणं आवडतं. पण निकला उठताच तिला पाहावं लागतं. प्रियंका म्हणाली होती की, ही गोष्ट तिला नक्कीच त्रास देते, पण तिला निकची ही सवयही आवडते.