धक्कादायक : साईशा ते कंगाना, `या` 5 अभिनेत्रींचं बालपणातच लैंगिक शोषण
आपल्या देशात आजही अनेक मुली लैंगिक अत्याचाराला बळी पडतात.
मुंबई : आपल्या देशात आजही अनेक मुली लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. अनेक बॉलीवूड स्टार्सही याचा बळी ठरले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्यांची यादी दाखवणार आहोत जे बालपणी लैंगिक शोषणाला बळी पडले होते.
सायशा शिंदे
सायशा शिंदेनेही लैंगिक छळाबाबत उघडपणे अनेकदा सांगितलं आहे. वयाच्या 10 व्या वर्षी एका मुलाने विनयभंग केला. लैंगिक छळाची व्यथा सांगत साईशा शिंदे म्हणाली की, समलिंगी असल्यामुळे हे सगळं पाहावं लागलं.
कंगना राणौत
लॉक अपच्या एपिसोडमध्ये कंगना राणौतने तिच्या भूतकाळाची पानं उघडून खळबळ उडवून दिली आहे. कंगना राणौतने दावा केला आहे की, ती लहान वयातच लैंगिक छळाची शिकार झाली आहे. एका मुलाने तिच्या गावी तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. तो मुलगा कंगना राणौतला अयोग्यरित्या स्पर्श करायचा. त्यावेळी कंगना रणौत हे समजू शकली नाही. या घटनेचा संदर्भ देत कंगना राणौत म्हणाली की, आमच्या सोसायटीतील लोकं याविषयी मुलांशी बोलत नाहीत. देशातील बहुतांश मुलं लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. देशातील पुरुषांसाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
सोफिया हयात
एका पोस्टद्वारे सोफिया हयातने त्या काळातील अग्निपरीक्षाही कथन केली होती. सोफिया हयातने सांगितलं होतं की, वयाच्या 10 व्या वर्षी तिच्या काकांनी घाणेरडं कृत्य तिच्यासोबत करण्याचा प्रयत्न केला होता. सोफिया हयातच्या या खुलाशामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
आलिया कश्यप
या यादीत बॉलिवूड चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप हिचंही नाव आहे. आलिया कश्यपने एका पोस्टद्वारे सगळ्यांसमोर हे गुपित उघडलं होतं. आलिया कश्यपने सांगितलं होतं की, एका मध्यमवयीन व्यक्तीने तिच्यासोबत गैरवर्तन केलं होतं. अशा वाईट लोकांना टोमणा मारत आलिया कश्यपने लिहिलं होतं की, मृत्यूनंतर लोकं बलात्कार पीडितांसाठी मेणबत्ती मार्च काढतात. तो जिवंत असताना कोणीही ठोस पावलं उचलत नाही. महिलांना वाचवण्यासाठी लोकं काहीच करत नाहीत.
कल्की केकलन
बॉलीवूड अभिनेत्री कल्की केकलनचं शोषण झालं तेव्हा ती केवळ 9 वर्षांची होती. त्यावेळी कल्की केकलनं मौन बाळगलं, पण वर्षांनंतर अभिनेत्रीने मीडियासमोर हा वेदनादायक किस्सा सांगितला.