Richa Chadha Daughter Photo: बॉलीवुड अभिनेत्री रिचा चड्डाने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. आई झाल्यानंतर अली फजल आणि रिचा चड्डा यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. प्रथमच त्यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या मुलीची झलक दाखवली आहे. अशा परिस्थितीत काही बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डाच्या 14 दिवसांच्या मुलीला भेटण्यासाठी अली आणि रिचा चड्डाच्या घरी पोहोचल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये दिया मिर्झा, अहबाना आझमी, उर्मिला मातोंडकर अली फजल आणि रिचा चड्डा यांच्या 14 दिवसांच्या मुलीला भेटण्यासाठी घरी पोहोचल्या होत्या. शबाना आझमीने तिच्या इन्स्टाग्रामवर या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे.  या फोटोंनी तिने 'नवीन आई आणि मुलाची मावशी/काकूंसोबत' असं कॅप्शन दिलं आहे. 


'माझी मुलगी किती भाग्यवान'


अभिनेत्री रिचा चड्डा सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. 'सर्वात सुंदर आणि सर्वोत्कृष्ट लोकांचे आशीर्वाद आणि स्पर्श मिळण्यासाठी ही लहान मुलगी किती भाग्यवान आहे! गुड्डू पंडित खूप खुश! आई किती धन्य आहे! अशा बंधनांसाठी देवाचे आभार. मला समजून घेतल्याबद्दल दीयाचे खूप खूप आभार. असं तिने पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. 



मावशी/काकूंची टोळी


शबाना आझमीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये रिचा चड्डा तिच्या लहान मुलीसोबत कपडे आणि टॉवेलमध्ये गुंडाळून बसलेली दिसत आहे. दिया, तन्वी, शबाना आणि उर्मिला त्याच्या आजूबाजूला बसलेल्या आहेत. या फोटोमध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. तर मुलीचा चेहरा मुलीच्या इमोटिकॉनने लपविला आहे.  'नवीन आई आणि बाळाच्या काकूंसोबत' असं फोटोंना कॅप्शन दिलं आहे.