मुंबई : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांना अनेकदा ट्रोल केलं जातं. आता पुन्हा एकदा शबाना आजमी एका पोस्टरमुळे ट्रोल केलं जात आहे. देशभरात चैत्र नवरात्री साजरी करण्यात येत आहे. याच नवरात्री दरम्यान शबाना आजमी यांना ट्रोल केलं जात आहे. शबाना आजमी यांच्या नावाने एक पोस्ट बनवून त्याला व्हायरल करण्यात आलं आहे. शबाना आजमी यांच्या नावाने लिहिण्यात आलेल्या या पोस्टला धार्मिकतेचा रंग देण्यात आला आहे. अशाप्रकारच्या संदेशामुळे लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. या पोस्टद्वारे लोकांनी त्यांना टॅग करून ट्रोल करण्यास सुरूवात केली. त्या ट्रोलवर शबाना आजमी यांनी खुसाला केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये धार्मिकतेवर संदेश लिहिण्यात आला असून त्याला शबाना आजमी यांच्या नावाने पसरवले जात आहे. यावर शबाना आजमी यांनी मी असं कधीच म्हटलं नसल्याचं सांगितलं आहे. हे अतिशय मूर्खपणाचं असून ट्रोलर्स जाणूनबुजून लक्ष्य करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मी कोणत्याही महिलेचा धर्म लक्षात न घेता सर्व महिलांसाठी काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शबाना आजमी यांनी ते पोस्टर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलं आहे. 



शबाना आजमी यांनी मी अशाप्रकारे धार्मिकतेवर कधीही काही म्हटलं नसल्याचं सांगितलं आहे. शबाना आजमी यांनी २०१७ मध्ये नवरात्रीच्या दरम्यान ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी 'या दुर्गाष्टमीला जन्माच्या आधीच कोणत्याही दुर्गेची भ्रूणहत्या केली जाऊ नये, कोणतीही सरस्वती शाळेत जाण्यापासून वंचित राहू नये, कोणत्याही लक्ष्मीला आपल्या पतीकडून पैसे मागावे लागू नये, पार्वतीला हुंड्यासाठी मारले जाऊ नये, कोणत्याही कालीला फेअरनेस क्रिम लावण्याची गरज पडून नये' अशाप्रकारची एक पोस्ट शेअर केली होती.



शबाना आजमी यांच्या २०१७ साली लिहिण्यात आलेल्या पोस्टमध्ये कुठेही धार्मिकतेवर लिहिण्यात आलं नव्हतं. परंतु या नवरात्रीच्या दिवसात शबाना आजमी यांच्या पोस्टला धार्मिकतेचा रंग चढवून व्हायरल केलं जात असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.