Shah Rukh Khan and Rani Mukerji Intimate Scene : 'कभी अलविदा ना कहना' (Kabhi Alvida Na Kehna) हा चित्रपट आज ही प्रत्येक व्यक्तीच्या आठवणीतला आहे. हा चित्रपट 2006 साली प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरनं केलं होतं. या चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan), रानी मुखर्जी (Rani Mukerji), प्रीति झिंटा (Preity Zinta), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि किरण खेर (Kirron Kher) यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील इंटिमेट सीन हे चर्चेचा विषय ठरले होते. या चित्रपटात इंटिमेट सीन नसले पाहिजे या मतावर आदित्य चोप्रा (Aditya Chopra) हे खंबीर होते. मात्र, करण जोहरनं (Karan Johar) त्यांचं एक ऐकलं नाही आणि त्याला पाहिजे तेच केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख आणि रानी हे दोघं एकमेकांवर प्रेम होत आणि त्यासाठी ते दोघं त्यांच्या पार्टनरला धोखा देखील देतात. या दरम्यान, त्या दोघांमध्ये इंटिमेट सीन्स देखील असतात. त्यामुळे चित्रपटाचे डिस्ट्रीब्यूटर आणि YRF च्या प्रमुख आदित्य चोप्रा यांच्यात वाद झाला होता. करण जोहरनं ऑल अबाउट मूव्हीज पॉडकास्टवर करण जोहरनं तिच्या लढ्याबद्दल खुलासा केला, मी त्या सीनचे शूटिंग करत होतो, लोकेशनवर खूप बर्फ होता. मग आदित्य चोप्रा यांनी फोन केला. त्यावेळी तो म्हणाला, मी गेल्या अनेक दिवसांपासून या गोष्टीचा विचार करत आहे आणि माझ्या मनात ही गोष्ट वारंवार येत आहे. आपण हा इंटिमेट सीन शूट करायला नको. मला वाटतं भारतातील लोक त्या गोष्टीला फॉलो करतील. त्यामुळे आपण हा सीन चित्रपटातून काढून टाकायला हवा. 


हेही वाचा : युट्यूबर Armaan Malik च्या दुसऱ्या पत्नीनं खरेदी केला आलिशान महाल!


आदित्यचं बोलणं ऐकल्यानंतर करणनं विचार केला मात्र, त्यानं चित्रपटातील हा सीन शूट केला. आपण कोणासोबत रिलेशनशिपमध्ये असताना S*X होणार नाही असं शक्य आहे का? त्यावर आमच्यात फोनवर खूप मोठा वाद झाला होता. मी अडून राहीलो. पण जेव्हा मी यावर शांतपणे विचार केला तेव्हा मला कळलं तो जे बोलत होता ते योग्य होतं. ते दोघं जर त्यांच्या फिजीकल रिलेशनशिपमध्ये पुढे गेले नसते तर प्रेक्षकांनी त्यांना अजून जास्त प्रेम दिले असते. 


दरम्यान,  'कभी अलविदा ना कहना' या चित्रपटात शाहरुख खान आणि प्रिती झिंटा एकत्र दाखवले आहेत. तर राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांची जोडी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट त्या काळात इंटिमेट सीनमुळे चर्चेत आला होता.