Shah Rukh Khan News :  ढोल ताशांचा गजर, गणेश भक्तांचा उत्साह... गणरायाचा जयघोष अशा भावपूर्ण वातावरणात आज घरोघरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मोठ्या भक्तिभावानं आणि आनंदमय वातावरणात भाविकांनी गणेशाचं स्वागत केलं. राजकीय नेत्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वच गणेशाच्या भक्तीत रंगून गेलेयत. गणेशोत्सवाच्या उत्सवपर्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालीय, अशातच आता बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या घरी देखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरूख खानने पोस्ट करत चाहत्यांना याची माहिती दिली. गणपती बाप्पा जी घरी स्वागत आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला श्री गणेशाच्या पूजनाच्या अद्भुत दिवसाच्या शुभेच्छा. भगवान गणेश आपल्या सर्वांना सुख, बुद्धी, उत्तम आरोग्य आणि भरपूर मोदक खाण्याची आशीर्वाद देवो!, असं ट्विट शाहरूख खान याने केलं आहे.



दरम्यान, महाराष्ट्राचा लोकोत्सव म्हणजे गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. महाराष्ट्रच नाही तर देशभरात गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली. मुंबईसह राज्यभरातील भक्त गणेशोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाले आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हा जयघोष सर्वत्र ऐकून येतोय. सार्वजनिक मंडळांपासून ते घरोघरी गणराज विराजमान झाले आहेत.