Shah Rukh Khan Deepika Padukone Jawan: अभिनेता शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेल्या 'जवान' चित्रपट तिकीटबारीवर धमाकेदार कामगिरी करत आहे. भारतामध्ये या चित्रपटाने 400 कोटींची कमाई केली असून जागतिक स्तरावर हा आकडा 300 कोटी आहे. या चित्रपटाच्या यशानंतर काल पत्रकारांशी शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणबरोबरच अन्य कलाकारांनी संवाद साधला. शाहरुख आणि दीपिका दोघांनी यावेळेस चलेया गाण्यावर डान्सही केला. या इव्हेंटमधील व्हिडीओ अनेकांनी 'एक्स' (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत. 


पहिल्यांदा चर्चा कुठे झाली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखने या कार्यक्रमामध्ये अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिली. शाहरुखने अनेक गोष्टींबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं. शाहरुखने यावेळेस 'जवान' चित्रपटामध्ये दीपिका पादुकोणला भूमिका देण्याचा निर्णय कसा घेतला याबद्दलचीही माहिती दिली. चित्रपटामध्ये ऐश्वर्या ही भूमिका साकारणाऱ्या दीपिकाची निवड कशी झाली याचा रंजक किस्सा शाहरुखने सांगितला. या कार्यक्रमाला दीपिका ब्लॅक अॅण्ड व्हाइट साडी नेसून आली होती. दीपिका फारच सुंदर दिसत होती. संगीतकार अनिरुद्ध रविचंदर हा रॅपर राजा कुमारीबरोबर या कार्यक्रमाला हजर होता. यावेळेस बोलताना शाहरुखने दीपिका पादुकोणाला आपण ऐश्वर्या या भूमिकेची ऑफर 'पठाण' चित्रपटामधील 'बेशरम रंग' गाण्याच्या शुटींगदरम्यान दिल्याचं सांगितलं. या गाण्याचं शुटींग सुरु असतानाच पहिल्यांदा आपण 'जवान'मधील दीपिकाच्या या भूमिकेबद्दल आम्ही दोघांनी चर्चा केलेली असं शाहरुख म्हणाला. 


शाहरुख म्हणतो, 'मी विचारलं अन्...'


शाहरुख खानने 'बेशरम रंग'च्या शुटींगच्या वेळेसचा किस्सा सांगितला. दीपिकाला पाहून अचानक शाहरुखच्या मनात दीपिका 'जवान'मध्ये भूमिका साकारु शकते असं वाटलं. त्याने त्याची मॅनेजर पूजा ददलानीला 'ही आईच्या भूमिकेमध्ये कशी वाटेल?' असं विचारला. शाहरुखचं ते वाक्य ऐकून पूजा दीपिका जवळ गेली आणि तिच्याशी चर्चा करु लागली. अचानक पूजा मागे वळाली आणि सांगितलं की दीपिकाने या भूमिकेसाठी होकार दिला आहे. दीपिकाने केवळ होकार कळवला नाही तर आपण काम करायला तयार असल्याचं अटली यांना (दिग्दर्शक अटली कुमार) सांग, असंही मला म्हणाल्याचं शाहरुखने सांगितलं. 


या गाण्यावरुन वाद


'बेशरम रंग' हे तेच गाणं आहे ज्यामध्ये दीपिका परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन मोठा वाद निर्माण झालेला. याच गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान दीपिकाला 'जवान'मधील आईचा रोल ऑफर केल्याचा खुलासा शाहरुखने केला आहे.