`तुला अभिनय येत नाही...`, महिलेने तोंडावर अपमान केल्यानं Shah Rukh Khan ला कोसळलं रडू!
Shah Rukh Khan : शाहरुख खान सध्या जवान चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, त्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक महिला शाहरुखला त्याला अभिनय करता येत नाही असं सांगताना दिसते. तर त्यावर शाहरुखच्या प्रतिक्रियेनं सगळ्यांना आश्चर्य झाला.
Shah Rukh Khan : 'कौन बनेगा करोडपती' च्या तिसऱ्या सीझनचं सुत्रसंचालन बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खाननं केलं होतं. त्यावेळी एक महिला स्पर्धक हॉट सीटवर बसली होती. पण यावेळी ही महिला शाहरुखवर रागावल्याचे पाहायला मिळाले. त्या महिलेनं ज्या प्रकारे शाहरुखला वागणूक दिली ते पाहून शाहरुखसोबतच तिथे उपस्थित असलेले सगळेच आश्चर्यचकित झाले होते. असं असताना देखील शाहरुखनं त्याच्या विनोदी बुद्धीचा वापर केला आणि संपूर्ण वातावरण थोडं शांत केलं.
शाहरुख सध्या त्याच्या या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की ती महिला त्याला फटकारते आणि ते पाहता शाहरुखला अश्रू अनावर होत आहे असं अभिनेता बोलताना दिसतो. KBCच्या एका एपिसोडमध्ये, एका महिला प्रोफेसर स्पर्धक म्हणून हॉट सीटवर बसली होती. मात्र, एपिसोडच्या सुरुवातीपासूनच ती शाहरुख खानवर सतत काही कारण नसताना रागावलेल्याचे पाहायला मिळत होते. तर दुसरीकडे शाहरुख तिची स्तुती करत तिच्याशी गंमतीत बोलताना दिसतो. मग काय शाहरुख खान तिची खोड काढत तिच्याशी मस्करी करताना दिसला.
ही महिला कोणत्या कोणत्या टप्प्यात शाहरुखवर रागवली हे पाहायला मिळत आहे. त्या संपूर्ण एपिसोडमधील काही क्लिप एकत्र करून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, व्हिडीओत खेळ सोडायचा असल्यास मी शो सोडतं किंवा क्वीट करते असं बोलत नाही तर शाहरुख मला मिठी मार असं बोलतात असं अभिनेता सांगतो. तरी देखील ती महिला मला शो सोडायचा आहे पण मला तुला मिठी मारण्यात थोडाही इन्ट्रेस्ट नाही असं सांगते. हे ऐकूण शाहरूखला आश्चर्याचा धक्का बसतो. त्यानंतर देखील शाहरुख त्या महिलेशी नीट बोलतो आणि म्हणतो की तुम्ही इथे थांबा. हा चेक जर मी तुमच्या आईला दिला तर तुम्हाला वाईट वाटणार नाही ना? कारण त्या मला नक्कीच मिठी मारतील.
हेही वाचा : 'बदकासारखे ओठ', कपिल शर्मानं खिल्ली उडवण्यावर Sumona Chakravarti म्हणाली...
दरम्यान, अशा प्रकारे कोणती व्यक्ती कशीही बोलत असली तरी शाहरुख कधीच त्याचा चार्म सोडत नाही. इतकंच नाही तर त्यानं त्याच्या विनोदी बुद्धीनं कसं सगळ्यांना हसवलं ते पाहता येणार आहे. शाहरुखचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दुसरीकडे शाहरुख आता त्याच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.