मुंबई : रोमान्सचा बादशाहा शाहरुख खान (Shah Rukh Khan) कायम चर्चेत असतो. शाहरुखचं खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्याबद्दल चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगत असतात. आता देखील शाहरुखचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्याच्या स्टाईल पासून ते शहरुख जे बोलला आहे, ते ऐकून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खानने नेहमीप्रमाणे यावेळीही कार्यक्रमात प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमात त्याने त्याच्या राहत्या घरात किती टीव्ही आहेत? या टीव्हीची किंमत काय? याबाबत सांगितले आहे.


कार्यक्रमाच्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये बोलताना शाहरुख म्हणाला, कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर होण्यापूर्वी मी घरी टीव्हीसाठी पैसे खर्च केले. माझ्या तसेच माझ्या तीनही मुलांच्या बेडरुमध्ये, लिव्हींग रुममध्ये प्रत्येक रुममध्ये एक-एक टीव्ही आहे.'



पुढे शाहरुख म्हणाला, 'माझ्या घरात 11 ते 12 टीव्ही आहेत. प्रत्येत टीव्हीची किंमत ही एक ते दीड लाख रुपयांपर्यंत आहे...' म्हणजे शाहरुखच्या घरात असलेल्या सर्व टीव्हींची किंमत तब्बल 30 ते 40 लाख रुपये आहे. 


अभिनेत्या व्हिडीओनंतर  सोशल मीडियावर अनेक कमेंट येत आहेत. एक युजर म्हणाला, 'मी एवढ्या रुपयांमध्ये एक घर घेईल....', तर अन्य एका युजरने “म्हणूनच शाहरुख किंग आहे” असं म्हटलं आहे. सध्या शाहरुखचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.