मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान सर्व धर्मांचे सण साजरे करतो. शाहरूख खानने आपल्या घरी गणेशोत्सव साजरा केला. किंग खानने आपल्या घरी गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली. मात्र कथित धार्मिक लोकांनी त्याला काही शब्द सुनावले. या अगोदर जन्माष्टमीवर दहीहंडी फोडण्यावर शाहरूखच्या विरोधात फतवा जाहीर केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भगवान गणेश मूर्तीच्या समोर प्रार्थना करताना शाहरूखने आपल्या लहान मुलाचा अबरामचा बाप्पासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, आमचा गणपती, पप्पा घरी आला आहे. कारण लिल त्यांना असं बोलतो. शाहरूखची ही पोस्ट खूप व्हायरल झाली आणि त्याला ट्रोल करण्यात आलं. यावर एकाने कमेंट केली, हे चुकीचं आहे आपण एक मुसलमान आहे तर तुम्ही गणेशोत्सव साजरे का करता. 



या व्यतिरिक्त खानला विचारण्यात आलं की, मूर्ती पूजा करणं योग्य आहे का? एका युझर्सने लिहिलं होतं की, धर्मात चुकीच्या गोष्टी करताय. भारत हा सेकुलर देश आहे.