Mufasa The Lion King : 'मुफासा: द लायन किंग' या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुफासाच्या भूमिकेसाठी शाहरुख खाननं आवाज दिला होता. तर सिंबासाठी मोठा मुलगा आर्यन खाननं. आता या चित्रपटातून शाहरुख खानचा मुलगा अबराम खान हा पदार्पण करणार आहे. या प्रोजेक्टमधून अबराम डेब्यू करणार आहे. त्यानं या चित्रपटासाठी डबिंग केली आहे. या चित्रपटात तो यंग मुफासाचा आवाज देणार आहे. चला या चित्रपटाविषयी जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिज्नी मीडिया फ्रेंचायझीच्या या चित्रपटाच्या सीरिजचा पहिला क्लासिक अ‍ॅनिमेशन चित्रपट 'द लायन किंग' हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यानंतर 2019 मध्ये या चित्रपटाचा एक रीमेक बनवण्यात आला. आता तब्बल 5 वर्षानंतर त्याचा प्रीक्वल येणार आहे तर या प्रीक्वलचं नाव 'मुफासा: द लायन किंग' असं ठेवण्यात आलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

गेल्या चित्रपटात अर्थात The Lion King मध्ये आपण सगळ्यांनी सिंबाची गोष्ट पाहिली. त्याला शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खाननं आवाज दिला होता. तर सिंबाचा वडील मुफासाला शाहरुख खाननं आवाज दिला होता. मुफासाचा आवाज हा शाहरुखचा आहे. तर आता मुफासाच्या लहानपणाचं व्हर्जन हे आपल्या सगळ्यांना त्याचा छोटा मुलगा अबरामच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. शाहरुख खाननं मुफासा, आर्यन खाननं सिंबा, अबराम खाननं यंग मुफासाचा आवाज दिला आहे. तर संजय मिश्रा यांनी पुम्बा आणि श्रेयस तळपदेनं टिमनच्या भूमिकेला आवाज दिला आहे. 


हेही वाचा : Olympic मध्ये Tom Cruise ला महिलेनं बळजबरी केलं Kiss, 'हेच पुरुषानं केलं असतं तर..?'


या चित्रपटाविषयी सविस्तर बोलायचे झाले तर ऑस्कर विनर दिग्दर्शक बॅरी जेनकिंस यांनी Mufasa: The Lion King चं दिग्दर्शन केलं होतं. तरुणपणातील मुफासाची मैत्री, सत्ता काबीज करणं आणि त्यानं सुरु झालेलं युद्धाची मजेशीर कहानी पाहायला मिळणार आहे. कारण जंगलचा राजा फक्त एकच आहे. तर हा चित्रपट 20 डिसेंबर रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत 2D आणि 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता सगळ्या प्रेक्षकांना अबरामचं न कळत तो कसं काम करू शकतो हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे.