Kangana Ranaut On Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा जवान हा चित्रपट काल प्रदर्शित झाला आहे. त्याच्या या चित्रपटाला पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांनी आगाऊ बूकिंग केली. त्यातल्या काही प्रेक्षकांनी काल पहिल्याच दिवशी चित्रपट पाहिला. चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तर अनेक सेलिब्रिटींनी देखील हा चित्रपट पाहिला. त्यात बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचे देखील नाव आहे. कंगनानं देखील हा चित्रपट पाहिला. त्यानंतर कंगनानं शाहरुख खानसाठी हे खास पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगना म्हणाली की 'नव्वदच्या दशकात लव्हर बॉयच्या नावानं लोकप्रियता मिळवली, त्यानंतर अनेक वर्षे स्ट्रगल केलं. चाळीशीच्या अखेरीस पासून पंनाशीच्या मध्यापर्यंत प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी खूप मेहनत केली. आता 60 ठीत असताना भारताचा एक मास सुपर हीरो म्हणून समोर आला. हा तर खऱ्या आयुष्यात देखील कोणत्याही महानायकापेक्षा कमी नाही. मला तो काळ आठवतोय जेव्हा त्याच्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं होतं. शाहरुख खाननं केलेलं स्ट्रगल हे कोणत्याही इतर कलाकारांसाठी एका मास्टर क्लास सारखं आहे. जो त्याच्या करिअरच्या मोठ्या काळाचा आनंद घेत आहे. ज्यानं पुन्हा एकदा प्रेक्षकांनी त्यांचं नातं बनवलं. शाहरुख खान हा चित्रपटांचा देव आहे, ज्याची भारताला गरज आहे. फक्त मिठी मारण्यासाठी किंवा डिंपलसाठी नाही, तर संपूर्ण जगाला वाचवण्यासाठी आहे. किंग खान तुझी जिद्द, मेहनत आणि नम्रतेला सलाम.'



कंगनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक तिनं नक्की जवान पाहिला की नाही हे स्पष्ट केलेलं नाही. पण तिनं या पोस्टच्या अखेरीस जवानच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा नक्कीच दिल्या आहेत. हॅशटॅग देत कंगना म्हणाली की जवानच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा! 


हेही वाचा : 'बापाला जाऊन 4 दिवस झाले नाहीत आणि...', दहीहंडी कार्यक्रमात डान्स केल्यानं गौतमी पाटील ट्रोल


शाहरुखचा जवान हा चित्रपट प्रदर्शनाच्या सात दिवस आधीच आगाऊ बूकिंग सुरु झाली होती.या चित्रपटात शाहरुखसोबत महत्त्वाच्या भूमिकेत नयनतार, विजय सेतुपति, सान्या मल्होत्रा, प्रियामनी, गिरिजा ओक, संजीता भटाचार्य, रिद्दी डोग्रा आणि सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत. तर बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एटलीनं केले आहे. तर हा चित्रपट तमिळ, तेलगू, हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती ही शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं केली आहे.