नवी दिल्ली :  वाराणसी पोलिसांनी बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खानला ५.५९ लाख रुपये भरण्याची नोटीस पाठविली आहे. हे प्रकरण शाहरुखच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ च्या वाराणसीतील प्रमोशन दरम्यानचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता सिनेमाच्या प्रमोशच्यावेळेस अशा गोष्टी पेरल्या जातात असे तुम्हाला वाटेल पण हे प्रकरण थोड गंभीर आहे.


आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा वाराणसीला गेले होते. त्यांच्यासोबत निर्देशक इम्तियाज अली आमि भोजपुरी गायक मनोज तिवारीही देखील उपस्थित होते.त्यांच्या सुरक्षेसाठी 224 जवान तैनात करण्यात आले होते. त्यावेळी ते वाराणसीतील अशोका इंस्टिट्यूटमध्येही गेले होते.


पोलीसांच्या पगाराची रक्कम ६.११ लाख बनते त्यातील अशोका इंस्टिट्यूटतर्फे साधारण ५१ हजार १३२ रुपये देण्यात आल्याचे एसएसपी आरके भारद्वाज यांनी सांगितले.


सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी ५१ हजाराची रक्कम पोलीस विभागाला देण्यात आली आहे. एवढीच रक्कम देण्याचे ठरले होते असे कार्यक्रमाचे आयोजक अंकित मौर्यने सांगितले. त्यामुळे हे प्रकरण नेमके काय आहे कळण्यास मार्ग नव्हता. पण आयोजक अंकित मोर्य यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर या प्रकरणावरचा पडदा उघडला.


...त्यामुळे नोटीस शाहरुख आणि टीमला


‘आमचा कार्यक्रम एक तासाचा होता आणि त्याचे 51 हजार 132 रुपये आम्ही दिले आहेत. इतर कार्यक्रमांसाठी त्यांची पूर्ण टीम शहरातील विविध भागात थांबली होती. त्यामुळे हे नोटीस शाहरुख खान आणि त्याच्या टीमला पाठविण्यात यावे’ असे आम्ही पोलीस विभागाला अपील केले असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक अंकित मोर्य यांनी सांगितले.