10,600,000 तासात 37 लाख व्ह्यूज! `या` तामिळ चित्रपटाला मागे टाकत शाहरूखच्या `जवान`चा विक्रम...
Shah Rukh Khan Jawan Most Watched on Netfilx: नेटफ्लिक्सवर `जवान` हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता तो ओटीटीवरील सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट आहे. त्यामुळे याविषयी खुद्द शाहरूख खाननंही आनंद व्यक्त केला आहे.
Shah Rukh Khan Netfilx: एखाद्या कलाकारानं प्रेक्षकांवर काय जादू केली? हे काही आपण शब्दात सांगू शकत नाही. किंबहूना प्रेक्षकही ते सांगू शकत नाहीत. अशाच एका कलाकाराच्या, अभिनेत्याच्या याच जादूबद्दल सांगणं हे अतिशय कठीण आहे. पण त्याची जादू मात्र आजही तितकीच आहे आणि तो कलाकार म्हणजे शाहरूख खान. हे वर्ष शाहरूख खानसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. यावर्षी त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यातील दोन चित्रपटांनी तर बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला आहे तर त्याचा तिसरा 'डंकी' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात त्याचा 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र गर्दी खेचणारा ठरला.
यावर्षी त्याचा दूसरा चित्रपट प्रदर्शित झाला होता तो म्हणजे 'जवान'. या चित्रपटाचीही प्रचंड चर्चा रंगलेली होती. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट प्रचंड गाजला. आता ओटीटीवरही या चित्रपटानं सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर्षी नेटफ्लिक्सवर सर्वाधिक दर्शकसंख्या असणारा हा चित्रपट आहे. अटली यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट चांगलाच गाजला. सप्टेंबर महिन्यात या चित्रपटाची बरीच क्रेझ होती. या चित्रपटाची आगाऊ टिकीटविक्रीही प्रचंड झाली होती. त्यानंतर म्हणता म्हणता बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं तूफान कमी केली. नयनतारा आणि शाहरूख खानची रोमॅण्टिक केमेस्ट्रीही बरीच गाजली होती.
शाहरूख खान, दीपिका पादूकोण, विजय सेतूपती, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, गिरीजा ओक, नयनतारा अशी तगडी स्टारकास्ट होती. 'जवान' हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगूमध्ये प्रदर्शित झाला होता. शाहरूख खानच्या वाढदिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 2 नोव्हेंबर ते आज 22 नोव्हेंबरपर्यंत आलेल्या डेटानुसार आतापर्यंत 3.7Mn इतके व्ह्यूज आले आहेत. जे नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक पाहिली गेलेली फिल्म आहे. हा चित्रपट Extended Version मध्ये प्रदर्शित झाला आहे.
काय सांगतात आकाडे?
प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटानं जगभरात 1100 कोटी रूपयांची कमाई केली होती. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांत या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर 3,700,000 व्ह्यूज आले आहेत. 10,600,000 तासात हे व्ह्यूज आल्याचे नोंदवले गेले आहे. नेटफ्लिक्सच्या डेटानुसार, नॉन इंग्लिंशमधल्या टॉप 10 चित्रपटांमध्ये 'जवान'चा समावेश आहे. दोन आठवड्यानूसारचा डेटा आहे. Irugapatru हा तामिळ चित्रपट या लिस्टमध्ये आहे. 'जवान'नंतर ही फिल्म या लिस्टमध्ये दूसरी आहे. या चित्रपटाला 3,000,000 तासात 1,200,000 व्ह्यूज मिळाले आहेत.
काय म्हणाला शाहरूख खान?
ANI च्या रिपोर्टनूसार, शाहरूख खान यानं यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, ''मला हे जाणून खूपच आनंद झाला आहे की 'जवान' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर भारतातला सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे. आम्ही आमच्या प्रेक्षकांवरील प्रेमाखातर या चित्रपटाचे Extended Version सह संपूर्ण चित्रपटाचे प्रदर्शन केले होते. हा जो आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे त्यावरून हे स्पष्ट होते की भारतीय चित्रपट हा किती उच्च आहे. 'जवान' हा काही फक्त चित्रपट नाहीये. यात उर्जा आहे. कथा आहे. आनंद आहे. त्यामुळे मला याहून कसलाच आनंद नाही'', असं म्हणत त्यानं प्रेक्षकांचे आभार मानले आणि चित्रपटाची स्तुती केली.