Suhana Khan and Sharukh Khan: सुहाना खानचा 'द आर्चिज' हा चित्रपट उद्या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दोन वर्ष या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रतिक्षा करावी लागली होती. तेव्हा आता अखेर हा चित्रपट काही तासांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी या चित्रपटाचा प्रिमियर सोहळा पार पडला. अख्ख्या बॉलिवूडकरांनी यावेळी या चित्रपटाच्या प्रिमियरला हजेरी लावली होती. आपल्या लाडक्या लेकीसाठी, सुहाना खान हिच्यासाठी खास उपस्थिती दाखवली होती. यावेळी सुहाना ज्या लाल गाऊनमध्ये शाहरूख खानसोबत 'द आर्चिज'च्या प्रिमियरला आली होती. ही इच्छा शाहरूख खाननं 12 वर्षांपुर्वी व्यक्त केली होती. एका मानांकित अवोर्ड सोहळ्यात आपल्या लेकीसाठीचीही ही इच्छा सगळ्यांसमोर शाहरूख खाननं व्यक्त केली होती. जी आज पुर्ण झाली आहे. याचा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

12 वर्षांपुर्वी म्हणजेच 2011 साली अभिनेता शाहरूख खान याचा 'माय नेम इज खान' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील त्याच्या भुमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला होता. यावेळी अभिनेत्री रेखा यांच्याकडून त्यानं हा पुरस्कार स्विकारला. यावेळी त्यानं एक इच्छा व्यक्त करून दाखवली होती. तो म्हणाला होता की, ''माझी मुलगी सुहाना ही आजारी आहे. परंतु माझी इच्छा होती की माझ्यासोबत आज रेड गाऊनमध्ये येथे उपस्थित असती आणि माझ्यासोबत रेड कार्पेटवर चालत असती. परंतु आता तिची प्रकृती ठीक आहे.'' यावेळी सर्वांनी त्याचे कौतुक केले होते. 


हेही वाचा : कुणी हायफाय, कुणी प्रायव्हेट! 2023 मधील बॉलिवूड सेलिब्रेटींच्या लग्नसोहळ्यांची यादी पाहा एका क्लिकवर


सध्या त्याचा हा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. यावेळी चाहत्यांनी त्याचा हा जुना व्हिडीओ व्हायरल केला आहे आणि कशाप्रकारे शाहरूख खाननं व्यक्त केलेली ही इच्छा आज पुर्ण झाली आहे याची चर्चाही सगळीकडे सुरू झाली आहे. यावेळी आर्चिजच्या प्रिमियरला सुहाना खान रेड गाऊनमध्ये होती आणि ते दोघंही रेड कार्पेटवरून जात होते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


7 डिसेंबर रोजी सुहाना खानचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सुहाना खानसह खुशी कपूर, अगस्त्य नंदा हे दोन स्टारकीड्सही या चित्रपटातून डेब्यू करणार आहेत. त्यामुळे यावेळी त्यांच्या परिवारातील सदस्यांनीही या प्रिमियरला हजेरी लावली होती. सध्या त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.