Shah Rukh Khan : चेहऱ्यावर स्मितहास्य, गालावर खळी, कपाळावरून भुरभुरणारे केस आणि कमाल प्रेम... शाहरुख खान समोर आला की अनेक चाहत्या त्याच्यातील हेच बारकावे न्याहाळत बसतात. रुपेरी पडदा गाजवत दर्जेदार चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्यानं चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. असा हा अभिनेता, अर्थात किंग शाहरुख खान फक्त बॉलिवूडमध्येच नव्हे, तर परदेशी प्रेक्षकांमध्येही कमालीचा प्रसिद्ध आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखची ख्याती सर्वदूर पसरली असून, ही नवी बाब नाही. याची प्रचितीसुद्धा नुकतीच आली, जिथं त्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत पुन्हा आपल्याला 'किंग' का म्हणतात हे दाखवून दिलं. हल्लीच शाहरुख स्वित्झर्लंडमधील लोकार्नो शहरात पोहोचला होता, जिथं त्याला लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड अर्थात जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा क्षण प्रचंड अभिमानाचा होता कारण Pardo Alla Carriera का करिअर लेपर्ड पुरस्कारानं सन्मानित होणारा शाहरुख हा पहिलाच भारतीय कलाकार ठरला. 


'देवदास' या शाहरुखच्या गाजलेल्या चित्रपटाचं स्क्रिनिंग या चित्रपटामध्ये करण्यात आलं जिथं त्यानं उपस्थित चाहत्यांशीही संवाद साधला. या चर्चेदरम्यान त्यानं Google चा उल्लेखही केल्याचं पाहिलं आणि गुगलनंही शाहरुखच्या वक्तव्याची दखल घेत भन्नाट उत्तर दिलं. 


शाहरुख चाहत्यांना म्हणाला, मला जो ओळखत नाही त्यानं.... 


प्रकट मुलाखतीदरम्यान शाहरुख सुरुवातीलाच चाहत्यांची ओळख करून देण्यासाठी सूत्रसंचालकानं म्हटलं, 'हे त्यांच्यासाठी आहे जे यांना ओळखत नाहीत... या सभागृहात तशी माणसं नसावी. पण, ही मुलाखत टीव्हीवरही दिसत आहे... ' असं म्हणताचना शाहरुखनं सूत्रसंचालकाला थांबवत म्हटलं, 'जी मंडळी मला ओळखत नाहीत त्यांनी कृपया बाहेर जा.... माझ्याविषयी गुगल करा आणि त्यानंतर परत या'. शाहरुखनं गुगलचा उल्लेख करत हे वक्तव्य करत तिथं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 


हेसुद्धा वाचा : हात पसरवण्याची ओरिजनल पोज माझी नाही, मला ती.., SRK चा खुलासा! जनक कोण सांगितलं


आता तुम्ही म्हणाल गुगल 'शाहरुख खान कोण आहे?' या प्रश्नाचं वेगळं उत्तर आणखी काय देणार, तर गुगलनंही कमालच केली आहे. कारण खुद्द किंग खाननं इथं Google चा उल्लेख करतात तिथं X च्या माध्यमातून गुगलनं थेच एक पोस्ट शेअर केली. जिथं, 'मला गुग ल करा...' असं म्हणणाऱ्या शाहरुखचा एक फोटो आणि त्यासोबत मुकुटाचा इमोजी असं काहीसं बोलकं कॅप्शन दिलं. 



शाहरुख खाननं 77 व्या लोकार्नो फिल्म फेस्टीव्हलमध्ये घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींवर वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये त्यानं कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळापासून अगदी काही खास प्रसंगांबाबत उल्लेखही केला. शाहरुखच्या बोलण्यानं आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वानं यावेळी प्रत्येक उपस्थित भारावल्याचं पाहायला मिळालं.