मुंबई : बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी आता नेटफ्लिक्सवरील वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बार्ड ऑफ ब्लड' असं या वेबसीरीजचं नाव आहे. 'किंग खान' शाहरुख या वेबसीरीजची निर्मीती करत आहे. 'बार्ड ऑफ ब्लड' येत्या २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या वेब सीरीजचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखने ट्विटरवर या अॅक्शन वेबसीरीजची घोषणा करत फर्स्ट लूक शेअर केला आहे.



इमरान हाशमी या वेबसीरीजमधून वेब वर्ल्डमध्ये पदार्पण करणार आहे. 


'बार्ड ऑफ ब्लड' ही वेबसीरीज लेखक बिलाल सिद्दीकी यांचं पुस्तक 'बार्ड ऑफ ब्लड'वर आधारित आहे. अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या वेबसीरीजचं कथानक एका गुप्तहेराच्या, कबीर आनंदच्या बाजूने फिरत राहत. या वेबसीरीजमध्ये शोभिता धुलिपाला, कीर्ति कुल्हारी, विनीत सिंह प्रमुख भूमिका साकारणार आहे.