मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar Last Rituals) या अनंतात विलीन झाल्या आबेत. लता दीदींना त्यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी मुखाग्नी दिला. लता दीदी यांचं अखेरच दर्शन घेण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होत्या. ( shah rukh khan lata mangeshkar funeral) यावेळी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) देखील उपस्थित होता. तसेच त्याच्यासोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यादरम्यान पांढऱ्या टी-शर्टमध्ये आलेल्या शाहरुख खानने लता दीदींना खास पद्धतीने आदरांजली वाहिली. आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुख सार्वजनिक ठिकाणी क्वचितच दिसतो. अशा परिस्थितीत लता दीदींच्याअखेरच्या निरोपाला पोहोचलेल्या शाहरुख खानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.



लता दीदी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचलेल्या शाहरुख खानने या दिग्गज गायिकेच्या चरणांना स्पर्श करून त्यांना प्रदक्षिणा घातली. यानंतर त्यांनी लता मंगेशकर यांना हात जोडून नमस्कार केला. मात्र सोशल मीडियावर जो फोटो प्रचंड व्हायरल होत आहे, तो शाहरुख खान दुआ पठण करतानाचा फोटो आहे. लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देताना शाहरुख खान अल्लाकडे प्रार्थना करताना दिसला.



अभिनेता शाहरुख खानशिवाय मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकार लता मंगेशकर यांना निरोप देण्यासाठी पोहोचले. 



यादरम्यान अभिनेता आमिर खान, अभिनेता रणबीर कपूर, शंकर एहसान लॉय, जावेद अख्तर, अभिनेत्री श्रद्धा कपूर, विद्या बालन, जे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये क्वचितच दिसले होते, अशा अनेक दिग्गजांनी पाणावलेल्या नजरेने लता दीदींना निरोप दिला.