Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खाननं भारताच्या प्रजासत्ताक दिन दुबईत साजरा केला. त्यावेळी शाहरुखनं ग्लोबल व्हिलेजमध्ये त्याच्या चित्रपटसृष्टीतील 29 वर्षांच्या प्रवासा साजरी केला. या कार्यक्रमा दरम्यान, शाहरुखननं त्याच्या दाक्षिणात्य चाहत्यांच्या मनाला भावेल असं काही म्हणाला. त्यावेळी त्यानं दाक्षिणात्य अभिनेते अल्लू अर्जुन, प्रभास, यश, थलपति विजय आणि रजनीकांत हे त्याचे मित्र आहेत असा खुलासा केला. तर त्या शिवाय तो त्यांच्या डान्स मूव्ह्स विषयी देखील बोलताना दिसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखनं 80,000 पेक्षा जास्त चाहते असलेल्या चाहत्यांसाठी परफॉर्म केलं. त्यांचं मनोरंजन केलं. इतकंच नाही तर त्या कार्यक्रमातील एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होते. एका व्हिडीओत शाहरुखनं त्याच्या दाक्षिणात्य चाहत्यांचा उल्लेख केला आणि म्हणाला, माझे सगळे चाहते जे दक्षिण भारतातून आहेत. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिळनाडूवरून आहेत. तिथे माझे खूप मित्र आहेत. अल्लू अर्जुन, प्रभास, राम चरण, यश, महेश बाबू, थलपति विजय, रजनीकांत आणि कमल हासन. त्यानंतर पुढे शाहरुखनं मस्करी करत म्हटलं की मी विनंती करतो की त्यांनी इतका फास्ट डान्स करणं बंद करायला हवं. मी आता म्हातारा झालो आहे, तर मला त्यांच्या एनर्जीला मॅच करायला त्रास होतो.



शाहरुखनं पुढे त्याचा आगामी चित्रपट किंगविषयी देखील सांगितलं. त्यानं हे कन्फर्म केलं की चित्रपटाचं दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद करणार आहेत. त्यानंत ब्लॉकबस्टर ठरलेला पठाण या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. शाहरुखनं यावेळी लेक सुहाना खानसोबत कोलॅब करण्याविषयी देखील इशारा दिला आहे. त्याशिवाय सांगितलं की यात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत असेल. 


हेही वाचा : सैफवर हल्ल्यानंतर तैमूर, जेहसाठी करीनानं नाईलाजानं घेतला मोठा निर्णय


शाहरुखनं पुढे सांगितलं की 'मी तुम्हाला चित्रपटाविषयी जास्त सांगू शकत नाही. पण मी तुम्हाल हे सांगू शकते की हा मनोरंजक असणार आहे. मी आधी अनेक टायटल वापरले आहेत आणि आता आमच्याकडच्या चांगल्या टायटलची यादी संपली आहे. शाहरुख खान इन अ‍ॅन्ड एज कसं आहे? शाहरुख खान किंग हे थोडं शो ऑफ होऊ शकतं, पण जसं आपण दुबईमध्ये आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये की राजा हा कायम राजाच राहतो.'