सैफवर हल्ल्यानंतर तैमूर, जेहसाठी करीनानं नाईलाजानं घेतला मोठा निर्णय

Saif Ali Khan Attack : सैफवर हल्ला झाल्यानंतर करीना कपूरनं मुलांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय

दिक्षा पाटील | Updated: Jan 29, 2025, 01:07 PM IST
सैफवर हल्ल्यानंतर तैमूर, जेहसाठी करीनानं नाईलाजानं घेतला मोठा निर्णय title=
(Photo Credit : Social Media)

Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर नुकताच हल्ला झाला. सैफच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर सैफच्या 2 सर्जरी करण्यात आल्या. सैफ आता घरी परतला आहे. पण त्याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. घराची सिक्योरिटी वाढवण्यात आली आहे. तर आता या सगळ्यात सैफ आणि करीनानं पापाराझींकडे एक विनंती केली आहे. त्याशिवाय करीनानं तिच्या मुलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार करीना कपूरच्या टीमनं आज मुंबईच्या पापाराझींची मीटिंग घेतली. यावेळी करीना आणि सैफनं त्यांना विनंती केली की तैमूर आणि जेहचे फोटो काढू नका. त्याशिवाय त्यांनी पापाराझींना घराच्या बाहेर न येण्याची देखील विनंती केली आहे. कारण त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आता त्या दोघांनाही त्यांच्या घराची सुरक्षा ही खूप जास्त महत्त्वाची आहे. कारण एका चुकीमुळे त्यांच्या घरात पुन्हा कोणीही येऊ शकतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

16 जानेवारी रोजी एक व्यक्ती गुपचूप सैफच्या घरात घुसला होता. सैफच्या मदतनीसनं जेव्हा त्याला येताना पाहिलं आणि तिनं ओरडायला सुरुवात केली. तेव्हा सैफ लगेत धावत तिथे गेला आणि त्यानं त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सैफवर त्यानं चाकूनं हल्ला केला. त्या व्यक्तीनं सैफवर तब्बल 6 वेळा हल्ला केला. यानंतर सैफच्या 2 सर्जरी झाल्या. इतकंच नाही तर त्याच्या मनक्याच्या बाजुला चाकूचा एक भाग राहिला होता. सर्जरी करून तो भाग काढण्यात आला. त्याशिवाय त्याच्या हातावर आणि मानेवर देखील अशा गंभीर दुखापत झाली आहे. काही दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर सैफला डिस्चार्ज मिळाला आणि तो घरी गेला. डॉक्टरांनी सांगितलं की जर त्याला गंभीर दुखापत झाली असती त्याच्या जीवाचा प्रश्न आला असता. 

हेही वाचा : VIDEO : सलमान खान मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर? पोलिसांची सुरक्षा अन् चाहते...

सैफवर हल्ला झाला तेव्हा त्याच्या घरी ड्रायव्हर नव्हता. त्यामुळे तो रिक्षानं रुग्णालयात गेला. रुग्णालयात पोहोचवणाऱ्या रिक्षा चालकाला सैफ डिस्चार्ज मिळाल्यानंतर भेटला आणि त्याला 50 हजार रुपये दिल्याचे म्हटले जाते. सध्या सैफ आणि करीना या दोघांनी कामावरून ब्रेक घेतला आहे आणि संपूर्ण कुटुंबासोबत वेळ व्यथित करत आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x