Dunki Teaser : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा आज 58 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं जवान चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटपॉर्फमवर प्रदर्शित झाला. तर दुसरीकडे आजचं त्याच्या 'डंकी' या चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. राजकुमार हिरानी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर त्यांनी शाहरुखच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या चाहत्यांना ही भेट दिली आहे. 'डंकी ड्रॉप 1' असं म्हणतं त्यांनी एक झलक दाखवली आहे. 


काय आहे या पहिल्या झलकमध्ये?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाची पहिली झलक 'डंकी ड्रॉप 1' मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या चित्रपटात चार मित्रांची एक गोष्ट दाखवण्यात आली आहे. ज्या चौघांचं इंग्लंडला जाण्याचं स्वप्ना असतं. परदेशात जाण्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. शाहरुख खान त्याच्या या चार मित्रांना लंडनला जाण्यासाठी मदत करण्याची सगळी जबाबदारी घेतो. डंकी या चित्रपटात प्रेम आणि मैत्री या दोन्ही गोष्टी पाहायला मिळत आहेत. या चित्रपटातील कॅरेक्टर्स काही वेगळे पाहायला मिळणार आहेत. तर लवकरच 'डंकी ड्रॉप 2' पाहायला मिळणार आहे. 


हेही वाचा : झोपडपट्टीतील महिलेनं अबरामला जबराम हाक मारताच, शाहरुखची अनपेक्षित Reaction


दरम्यान, पठाण आणि जवानमध्ये शाहरुखला अॅक्शन करताना पाहिल्यानंतर आता डंकीमध्ये शाहरुखला एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. साधी राहणी आणि सोजव्ळ स्वभाव असं काही आपल्याला त्यात पाहायला मिळणार आहे. शाहरुखसोबत विकी कौशलची देखील एक वेगळीच भूमिका पाहायला मिळणार आहे. 



दरम्यान, या चित्रपटात शाहरुखसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री तापसू पन्नू पाहायला मिळणार आहे. तर तिच्याशिवाय या चित्रपटात दीया मिर्जा, धर्मेंद्र, बोमन ईरानी, सतीश शाह हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या एका वर्षात शाहरुखचे पठाण, जवान हे दोन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता डंकी चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे. तर विकीची या चित्रपटात असलेली भूमिका ही पाहुण्या कलाकाराची असल्याचे म्हटले जाते. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर त्याच दिवशी दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा 'सालार' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या दोन मोठ्या कलाकारांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्यानं बॉक्स ऑफिसवर त्याचा काही परिणाम होणार का अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरु आहे.