`प्रॉपर्टीची वाटणी कशी होणार?`; 2 नोव्हेंबरच्या सकाळी शाहरुखसोबत काय झालं! मुलांविषयी सांगितली `ही` गोष्ट
Shah Rukh Khan talked About Property Distribution : मुलांमधील प्रॉपर्टीच्या वाटणीवर शाहरुख खान म्हणाला...
Shah Rukh Khan talked About Property Distribution : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा काल 2 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. दरवर्षी शाहरुखला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाहण्यासाठी प्रेक्षक उपस्थित असायचे यावेळी असं झालं नाही. त्यामुळे शाहरुखनं त्याचा वाढदिवस कसा साजरा केला हे सगळ्या चाहत्यांना जाणून घ्यायचं होतं. दरम्यान, आता त्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते या पोस्टमधून शाहरुखनं त्याचा वाढदिवस कसा साजरा केला याचा खुलासा केला आहे.
शाहरुख खाननं त्याच्या वाढदिवसानिमित्तानं एक पोस्ट शेअर केली. खरंतर, शाहरुख खानच्या या खास निमित्तानं वांद्रेतील एका फॅन क्लबनं एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यात तो सहभागी झाला होता. हा कार्यक्रम वांद्रेमध्ये एका फॅन क्लबनं आयोजित केला होता. या कार्यक्रमाचं नाव SRK Day होतं. तिथलाच एक फोटो त्यानं शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यानं त्याची सिग्नेचर पोज दिली असून त्याच्या मागे लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत शाहरुखनं कॅप्शन दिलं की 'माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं येण्यासाठी आणि हा दिवस इतका सुंदर बनवण्यासाठी तुमचे आभार... माझ्या वाढदिवसानिमित्तानं येणाऱ्या सगळ्यांना माझं प्रेम आणि जे येऊ शकले नाही, त्यांना खूप प्रेम.'
हेही वाचा : ऐश्वर्याच्या वाढदिवशी अभिषेकनं असं काय केलं? की घटस्फोटच्या चर्चांना मिळाली हवा
शाहरुखचं हे म्हणणं ऐकताच एका चाहत्यानं त्याला प्रश्न विचारला की 'त्यांच्या मुलांमध्ये भांडणं झाली तर तो कोणाची बाजू घेणार.' तर यावर उत्तर देत शाहरुख खान म्हणाला, 'खरंतर हे थोडं विचित्र आहे. मी देखील तोच विचार करतोय. मला त्यांच्यावर दया येते. देवाच्या कृपेनं आजवर त्यांच्यात भांडणं झाली नाही आणि व्हायला ही नको. नाही तर पॉपर्टीमध्ये वाटे करताना अडचणी येतील. पण मी सुहानाची बाजू घेईन. मुली चांगल्या असतात. मला त्या आवडतात कारण मुलांच्या अंगावर केस असतात. मला मुली सुंदर आणि गोड वाटतात. त्या तितक्याच स्ट्रॉंग असतात. त्यामुळे सुहानाला मी पाठिंबा देईन. कारण तिच्याबाजूनं ताकद असेल आणि मी माझी संपूर्ण ताकद लावून तिला पाठिंबा देईल.'