Jawan Leaked : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा यांच्या जवानची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत असताना आज हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची क्रेझ आणि उत्सुकता खूप जास्त होती. चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलाच उत्साह होता. अॅटलीनं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. अॅटलीच्या या चित्रपटाची क्रेझ फक्त भारतात नाही तर परदेशातही लागली आहे. 2023 मध्ये सगळ्यात जास्त बॉक्स ऑफिसवर कमाई करणारा चित्रपट हा जवान ठरणार अशा चर्चा रंगल्या आहेत. एकीकडे चित्रपट प्रदर्शित झाला आहे तर दुसरीकडे हा चित्रपट लीक झाला आहे. त्यामुळे आता निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाची क्रेझ दिवसागणिक वाढली आहे. जवानच्या चित्रपटाची आगाऊ बूकिंग झाली असता अनेकांना तिकिट मिळाली नाही आणि ते चित्रपट पाहू शकले नाही. याच कारणामुळे चित्रपटाची पायरसी करणारे देखील पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होताच काही तासात चित्रपट लीक झाला आहे. त्यामुळे निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे. अशा सगळ्या गोष्टीचा परिणाम हा चित्रपटाच्या कमाईवर पाहायला मिळणार आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


शाहरुख खानच्या या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर 'जवान' अनेक साईट्सवर लीक झाला आहे. तमिळरॉकर्स, एमपी4मूवीज, पागलवर्ल्ड, वेगामूवी, टॉरेंट आणि फिल्मीजिला सारख्या अनेक पायरसी करणाऱ्या साईट्सवर चित्रपट एचडी क्वालिटीमध्ये उपलब्ध असल्याचे म्हटले जाते. लीक होणारा शाहरुख खानचा हा पहिला चित्रपट नाही. याआधी शाहरुख खान आणि दीपिका पदुकोनचा पठाण हा चित्रपट देखील लीक झाला होता. हा चित्रपट लीक झाल्यानंतरही त्यानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 


हेही वाचा : Jawan Twitter Review : शाहरुखच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिले 5 स्टार! म्हणतात 'मास्टर पीस...'


'जवान' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवसांआधी म्हणजे 1 सप्टेंबर रोजी चित्रपटाची आगाऊ बूकिंग सुरु झाली होती. चित्रपटाची आगाऊ बूकिंग पाहता असं चित्र पाहायला मिळत आहे की प्रेक्षकांमध्ये शाहरुखची क्रेझ पाहता प्रेक्षकांमध्ये पायरेटेडे चित्रपटाची प्रतिक्षा लागली होती. आता या सगळ्यात ही गोष्ट पाहण्यासाठी आहे की पहिल्या दिवशी हा चित्रपट किती कमाई करेल. कारण चित्रपट आजही प्रदर्शित झाला असला तरी देखील चित्रपटाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतार, विजय सेतुपति, सान्या मल्होत्रा, प्रियामनी, गिरिजा ओक, संजीता भटाचार्य, रिद्दी डोग्रा आणि सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत. तर बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एटलीनं केले आहे. तर हा चित्रपट तमिळ, तेलगू, हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ही शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं केली आहे.