Pathaan Box Office Collection Day 8 : (Shah rukh khan) शाहरुख खाननं आता चारित्रात्मक भूमिका साकाराव्यात कारण, आता त्याचं वय वाढतंय असं म्हणत अभिनेत्याला फुकाचे सल्ले देणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी. कारण, या अभिनेत्यानं पुन्हा एकदा अनोख्या अंदाजात आपणच बॉलिवूडचं (Bollywood) किंग असल्याचं सिद्ध केलं आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे शाहरुखच्या 'पठान' चित्रपटाला मिळालेलं घवघवीत यश. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच होणारा विरोध पाहता यावेळी शाहरुखला अपयशाचा सामना करावा लागतोय की काय असंच अनेकांना वाटत होतं. पण, चित्र पूर्ण पालटलं. (shah rukh khan starrer Bollywood movie Pathaan Box Office Collection Day 8)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदर्शनानंतर 8 दिवसांमध्ये किंग खानच्या या चित्रपटानं विक्रमी कमाईची नोंद (Pathaan Box Office Collection) केली आहे. बुधवारीसुद्धा या चित्रपटानं दोन आकडी कमाई करत एकूण गल्ल्यामध्ये कोट्यवधींची भर घातली आहे. त्यामुळं ही ऐतिहासिक कामगिरी आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 


चित्रपटाच्या कमाईतून कलाकारांना मोठा नफा 


चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श आणि रमेश बाला यांच्याकडून सातत्यानं शाहरुखच्या या चित्रपटाच्या कमाईचे आकडे सर्वांसमोर आणले जात आहेत. जाणकारांच्या मते Pathaan 8 व्या दिवशी भारतामध्ये सरासरी 18 कोटींची कमाई करेल. दरम्यान, आताच्या घडीला या चित्रपटानं 348.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. बुधवारी चित्रपटाच्या कमाईचा वेग काहीसा मंदावला पण, ती कसरही हा चित्रपट भरून काढताना दिसत आहे. थोडक्यात ही कोट्यवधींची कमाई पाहता चित्रपटातील कलाकारांनाही यातून मोठा नफा होणार आहे. 


Pathaan ला रोखणं कठीण 


जागतिक स्तरावरही या चित्रपटाची दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत या चित्रपटानं जागतिक स्तरावर 675 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ज्यामुळं या आठवड्याच्या अखेरीस हा आकडा अगदी सहजपणे 700 कोटींपर्यंत पोहोचू शकतो. ज्यामुळं जॉन अब्राहम, शाहरुख खान आणि (deepika padukone) दीपिका पदुकोणच्या कारकिर्दीतील हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. किंबहुना शाहरुखनं आतापर्यंत भूमिका साकारलेल्या सर्वच चित्रपटांच्या कमाईला 'पठान'नं पिछाडीवर टाकलं आहे.


हेसुद्धा वाचा : मी कसे पण पैसे कमावेल तुम्हाला काय? Anurag Kashyap च्या लेकीचा वडिलांनाच उलट सवाल


 




प्रदर्शनानंतर या चित्रपटानं पहिल्याच आठवड्याच कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेतच. जागतिक पातळीवर 634 कोटी रुपयांची कमाई करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरला आहे. दर दिवशी या चित्रपटाच्या कमाईत मोठी भर पडत असून, अनेक विक्रमही तो मोडीत काढताना दिसत आहे. बरं याला होणारा विरोध आता मावळला असून, अनेकांनीच चित्रपटाला पसंतीही दिली आहे. तुम्ही 'पठान' पाहिलाय का?