मुंबई : आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सविस्तर आदेश दिल्यानंतर आता शाहरुख खान (Shahrukh Khan) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) विरोधात काही कठोर पाऊल उचलू शकतो का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. खरं तर, आर्यन खानच्या जामीन आदेशात, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, समान हेतू असलेल्या सर्व आरोपींनी बेकायदेशीर कृत्य करण्यास सहमती दर्शविली आहे हे न्यायालयाला पटवून देण्यासाठी रेकॉर्डवर कोणतेही सकारात्मक पुरावे नाहीत. कोर्टाच्या जामीन आदेशानंतर शाहरुखचे चाहते आता या प्रकरणी शाहरुख खानचे मौन तोडण्याची वाट पाहत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर शाहरुख खानने आतापर्यंत मौन बाळगले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृत्तानुसार, किंग खानच्या (Shahrukh khan) कायदेशीर टीमने आता सुपरस्टारला क्रूझ-ड्रग प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व करणारे एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्याचा मुलगा आर्यन खानवर खोटे आरोप लावणाऱ्या इतरांवर कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला. या प्रकरणात आर्यन खान (Aryan Khan) सुमारे तीन आठवडे तुरुंगात राहिला आणि नंतर जामिनावर सुटला.


टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शाहरुखच्या एका जवळच्या सहाय्यकाने एका मनोरंजन पोर्टलला सांगितले आहे की, 'शाहरुख खानला आर्यन खानला तुरुंगात टाकणाऱ्यांविरुद्ध बदला म्हणून कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला जात आहे. या प्रकरणात काही अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता आहे.