`देवदास` च्या सेटवर मद्यपान करायचा शाहरुख खान, अभिनेता टीकू तलसानियानं कारण सांगत केला खुलासा
Shah Rukh Khan Devdas : शाहरुख खान देवदासच्या सेटवर करायचा मद्यपान... टीकू तलसानियानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला खुलास...
Shah Rukh Khan Devdas : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खाननं आजवर अनेक भूमिका साकारल्या. त्यापैकी त्याची देवदास ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली. मात्र, तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की या भूमिकेसाठी शाहरुख खाननं खूप मद्यपान केलं होतं. तर याविषयी चित्रपटात धरमदासची भूमिका साकारणारा अभिनेता टीकू तलसानियानं याविषयी खुलासा केला आहे. टीकूनं सांगितलं की शाहरुख खानचं म्हणणं आहे की भूमिकेला एकदम हुबेहूब दाखवायचं असेल तर डोळ्यात मद्यपान केल्याचं दिसायला हवं.
चित्रपटसृष्टीत आणखी असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी देवदासची भूमिका साकारली पण ज्या प्रकारे शाहरुख खाननं साकारली त्याला तोड नाही. त्यानं ती भूमिका जणू काही जगली होती... तसं कोणी करु शकत नव्हतं. पारोच्या प्रेमात वेडा असलेल्या देवदासची भूमिका शाहरुखनं त्यात भूमिकेत उतरून साकारली आहे. त्यानंतर पारोच्या प्रेमात असलेला देवदास कसा मद्यपानाच्या आधीन होतो, ते जणू एखाद्या माणसालाच आपण हे सगळं करताना पाहतोय असं आहे. असं हे पडद्यावर दिसण्यासाठी शाहरुखनं सेटवर खरंच मद्यपान केलं होतं.
टिकू तलसानियानं 'डिजिटल कमेंट्री' ला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं की शाहरुख देवदासच्या भूमिकेसाठी सेटवर मद्यपान करायचा. आम्ही दुपार कडक उन्हात शूट करत होतो आणि तो एकामागे एक रमचे शॉट्स घेत होता. मी म्हटलं की सर तुम्ही काय करत आहात? आपल्याला अभिनय करायचा आहे. यावर शाहरुखनं देवदासच्या अंदाजात उत्तर दिलं की, सर अभिनय तर होईल. डोळ्यात मद्यपान दिसत नाही ना, त्याचं काय करायचं? ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, डोळ्यात मद्यपान केल्याचं दिसायला हवं ना.
हेही वाचा : 2 मुलं असलेल्या क्रिकेटपटूच्या प्रेमात वेडी होती 'ही' अभिनेत्री... धर्मांतर करुन लग्न केलं अन् झाली फसवणूक
टीकू तलसानियानं पुढे सांगितलं की शाहरुख खान जीनियस आहे आणि तो त्याच्या प्रत्येक भूमिकेवर काम करतो. तर शाहरुख सेटवर येताना तो आज जे शॉट देणार आहे त्याची डिटेल घेऊन यायचा की त्याला हा शॉट स्वत: कसा करायचा आहे. 'देवदास' विषयी बोलायचे झाले तर हा 2002 चा सगळ्यात सुपरहिट ठरलेला चित्रपट आहे. या चित्रपटाला 5 नॅशनल आणि 11 फिल्मफेयर पुरस्कार मिळाले होते.