Shah Rukh Khan visit Vaishno Devi : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान नुकताच वैष्णो देवीच्या दर्शनासाठी दरबारात पोहोचला होता. 2023 या वर्षात हा तिसऱ्यांदा वैष्णो देवीच्या दर्शनासाठी पोहोचला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे. खरंतर, व्हायरल झालेल्या व्हिडीओत शाहरुख हा वैष्णो देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या चढताना दिसला. 2023 हे वर्षे शाहरुखसाठी लकी ठरलं आहे. अशात आता त्याचा आगामी चित्रपटाच्या निमित्तानं तो वैष्णो देवीच्या दर्शनासाठी पोहोचल्याचं म्हटलं जातं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता शाहरुख खान हा त्याच्या डंकी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यातही हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्यानं त्याआधी वैष्णो देवीचं दर्शन घेत आशीर्वाद घेण्यासाठी तो पोहोचला आहे. सोशल मीडियावर जो व्हिडीओ समोर आला आहे त्यात शाहरुख खान वैष्णो देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या चढताना दिसत आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी दिसत आहे. तर सिक्योरिटी गार्ड्समध्ये असलेला शाहरुख संपूर्ण सुरक्षेनं देवीच्या दर्शनासाठी पोहोचला आहे. या दरम्यान, शाहरुख खाननं त्याचा चेहरा हा जॅकेटच्या हूडनं लपवला आहे. ज्यात लोक त्याला ओळखूही शकत नाही आहेत. 



शाहरुख या वर्षात तिसऱ्यांदा वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेल्यानं आता अशी चर्चा झाली आहे की कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी तो देवीचे दर्शन घेतो. 'पठाण' आणि 'जवान'च्या प्रदर्शनाआधी देखील शाहरुख वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेला होता. त्याच्या त्या दोन्ही चित्रपटांनी अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या परंपरेला पुढे सुरु ठेवत शाहरुख खान 'डंकी' च्या प्रदर्शनाआधी वैष्णो देवीच्या दर्शनासाठी पोहोचला. त्यामुळे आता शाहरुख 'डंकी' शाहरुखसोबत आता चाहत्यांनाही आशा आहे की हा चित्रपट नक्कीच हिट ठरेल. तर चाहत्यांना आशी आहे की हा चित्रपट हिट नाही तर सुपर हिट होईल. 


हेही वाचा : सुवर्ण संधी! तुम्हालाही करायचंय 'कांतारा' मध्ये काम? ऋषभ शेट्टीकडून ऑडिशन्सची घोषणा


डंकी विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर विकी कौशलची पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. या चित्रपटाचं बजेट हे 120 कोटींचं असल्याचं म्हटलं जातं. तर बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या 'डंकी'ची आणि प्रभासच्या 'सालार'ची लढत असणार आहे.