Shahrukh Khan : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान हा सध्या त्याच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. अशात सुरुवातीला चित्रपटाचा एक प्रीव्ह्यू प्रदर्शित झाला. त्यानंतर चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली. सगळ्यात आधी जिंदा बंदा हे गाणं प्रदर्शित झालं. या गाण्यात 1 हजार डान्सर्स असल्याची माहिती समोर आली होती. तर दुसऱ्या गाण्यात शाहरुखनं तब्बल 1 लाख रुपये किंमत असलेलं शर्ट परिधान केल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे चित्रपटाच्या बजेटपासून अनेक गोष्टींवर सध्या चर्चा सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खानचे चित्रपट हे त्याच्या प्रमाणेच खूप लॅविश असतात. सध्या शाहरुख खानच्या जवान चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचं बजेट किती आहे आणि त्यासाठी शाहरुखनं किती मानधन घेतलं असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाचं बजेट हे 300 कोटींचे असल्याचे म्हटले जात आहे. तर यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या पठाण या चित्रपटाचं बजेट 250 कोटी असल्याचे म्हटले जाते. तर पठाणनं बॉक्स ऑफिसवर 1 हजार कोटींची कमाई केली. त्यामुळे आता सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली आहे की जवान चित्रपट त्या पेक्षा जास्त कमाई करेल. जवळपास दोन वर्षांनंतर पडद्यावर परतलेला शाहरुख खान एकाच वर्षात दोन चित्रपट घेऊन आला आहे. वर्षाच्या सुरुवातीला 'पठाण' आणि आता 'जवान'. दरम्यान, जवान हा शाहरुख खानचा आतापर्यंत असलेला सगळ्यात जास्त बजेट असलेला चित्रपट आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, शाहरुख खानचा हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा प्रीव्ह्यू आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तर चलेया या गाण्यातील शाहरुख आणि नयनताराची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दरम्यान, शाहरुखशिवाय या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपति, सान्या मल्होत्रा आणि अनेक कलाकार आहेत. 


हेही वाचा : किस करताना कंगनानं घेतला चावा आणि...? अभिनेता म्हणातो...


शाहरुख खानचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटात पहिल्यांदा शाहरुख आणि विजयसेतुपतीला स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी प्रेक्षकांनमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. दुसरीकडे 'गदर 2' नं सात दिवसात बॉक्स ऑफिसवर 284.58 कोटींची कमाई केली आहे.