'कॉकटेल 2' मध्ये लव्ह ट्रॅंगल? 
'कॉकटेल'च्या पहिल्या भागानंतर तब्बल 14 वर्षांनी दिग्दर्शक दिनेश विजन 'कॉकटेल 2' साठी सज्ज झाले आहेत. परंतु यावेळी कथानकात मोठे बदल असणार आहेत. लव्ह ट्रॅंगल या चित्रपटाचा मुख्य गाभा असणार असून शाहिद आणि क्रिती मुख्य भूमिका साकारताना दिसतील. चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरू असून, मे 2025 मध्ये चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिद आणि क्रिती पुन्हा स्क्रीन शेअर करणार
शाहिद कपूर आणि क्रिती सेनन याआधी 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले होते. आता हे दोघे 'कॉकटेल 2' मध्ये पुन्हा एकदा रोमँटिक जोडी म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. एका रिपोर्टनुसार शाहिद आणि क्रितीला या चित्रपटाची कथा खूपच आवडली आहे आणि त्यासाठी ते प्रचंड उत्सुक आहेत.  


'कॉकटेल 2': दिग्दर्शन आणि कथालेखन 
'कॉकटेल 2' चे दिग्दर्शन होमी अदजानिया करणार आहे. तर कथा लव रंजन यानी लिहिली आहे. हा चित्रपट रोमँटिक आणि कॉमेडी शैलीत तयार होणार आहे. चित्रपटात आणखी कोणते कलाकार असतील, याबद्दल सध्या निर्माते विचार करत आहेत.  


शाहिदच्या आगामी प्रोजेक्ट्सची यादी लांबच लांब 
'कॉकटेल 2' व्यतिरिक्त शाहिद कपूर लवकरच 'देवा' चित्रपटात पूजा हेगडे सोबत झळकणार आहे. तसेच त्याने विशाल भारद्वाजसोबतही एक मोठा प्रोजेक्ट साइन केला आहे.  


कॉकटेल 2: नवीन पिढीसाठी मनोरंजनाची मेजवानी 
'कॉकटेल 2' हा सध्याच्या पिढीसाठी एक रोमँटिक कॉमेडीचा उत्तम अनुभव ठरणार आहे. शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्यासारखे प्रेक्षकांचे आवडते कलाकार या चित्रपटात एकत्र दिसणार असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.