Shahid Kapoor and Vijay Sethupathi Starrer Farzi Broke Record : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. शाहिदनं काही दिवसांपूर्वी ओटीटीवर पदार्पण केलं आहे. शाहिद गेल्या काही दिवसांपासून त्याचा अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या 'फर्जी' (Farzi) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरिजनं सगळ्यांना वेड लावलं आहे. या वेब सीरिजमध्ये शाहिदसोबत दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपति (Vijay Sethupati) आणि अभिनेत्री राशी खन्नानं देखील भूमिका साकारल्या आहेत. शाहिदच्या ओटीटी डेब्यू हा खरचं यशस्वी ठरला आहे. शाहिदच्या या पहिल्याच वेब सीरिजनं अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. खोट्या चलनी नोटा बनवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटबद्दल आणि एकूणच या गुन्ह्याबद्दल या वेबसीरिजमध्ये फार उत्तमरित्या भाष्य केलं गेलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फर्जी वेब सीरिजचा पहिलाच सीझन प्रदर्शित झाला आहे. दुसरा सीझन अजून प्रदर्शित झालेला नाही. या वेब सीरिजमध्ये शाहिदनं केलेल्या जबरदस्त परफॉर्मेन्सनं क्रिटिक्सपासून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. प्रेक्षक तर ही वेब सीरिज पाहत आहेत. त्यामुळे वेब सीरिजनं नवा रेकॉर्ड केला आहे. शाहिदनं स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे. शाहिदनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शाहिदनं दोन फोटो शेअर केले आहेत. 



ऑर्मैक्स इंडिया’च्या या रीपोर्टचे हे फोटो आहेत. एकात म्हटले आहे की अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेल्या फर्जीनं भारतात सगळ्यात जास्त पाहिल्या जाणाऱ्या वेब सीरिजचा रेकॉर्ड मोडला आहे. याच बातमीचा स्क्रीनशॉट शाहिद कपूरने शेअर करत त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, शाहिदनं एका मुलाखतीत वेब सीरिजच्या दुसऱ्या भागाविषयी वक्तव्य केलं आहे. सीरिजचा दुसरा भाग येण्यास वेळ असला तरी नक्कीच येणार असण्यावर शाहिदनं शिक्का मोर्तब केला आहे. 


हेही वाचा : 'Oscar जिंकल्यानंतर Guneet Monga ला करावे लागले होते रुग्णालयात दाखल', एमएम कीरवानी यांचा खुलासा


शाहिदची ही वेबसीरिज भारतातील सर्वाधिक पाहिली जाणारी ठरली आहे. या वेब सीरिजनं ‘मिर्झापूर’ आणि ‘द फॅमिली मॅन’सारख्या लोकप्रिय वेबसीरिजना मागे टाकलं आहे. या वेबसीरिजमध्ये शाहिद कपूर, केके मेनन, विजय सेतुपती, राशी खन्ना, अमोल पालेकर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता याच्या पुढच्या सीझनची सगळेच आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत.