Shahid kapoor Ishaan Khattar : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची आई निलिमा अझीम (Neelima Azeem) यांनी दोन लग्न केली. परंतू त्यांची दोन्ही लग्न फार काळ टिकू शकली नाहीत. शाहिद हा पहिल्या पतीपासून झालेला मुलगा आहे, तर ईशान हा दुसऱ्या पतीपासून झालेला मुलगा आहे. शाहिद कपूर (Shahid kapoor) आणि त्याचा भाऊ ईशान खट्टर (Ishaan Khattar) यांच्यातील नातं सर्वांनाच माहिती आहे. दोघं भाऊ एकमेकांवर खूप प्रेम करतात. अनेकदा दोघांचे मस्ती करतानाचे व्हिडीओ समोर आले होते. (shahid kapoor dance with ishaan khattar posted on instagram)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोघं नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर (Shahid kapoor Dance video) शेअर करत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसत आहे. शनिवारी शाहिद कपूरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आणि ईशान खट्टर मायकल जॅक्सनच्या (Michael Jackson Dance) गाण्यावर जॅक्सन स्टाईलने नाचताना दिसत आहे.


शाहिद कपूरने आपल्या ऑफिशियल इन्टाग्राम (Shahid kapoor Instagram) अकाऊंटवरून हा व्हि़डीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शाहिदच्या घरात शूट केल्याचं पहायला मिळतंय. प्रसिद्ध पॉप सिंगर आणि डान्सर राहिलेल्या मायकल जॅक्सनच्या स्मूथ क्रिमिनल (Michael Jackson Smooth Criminal Dance) या गाण्यावर दोघं भाऊ डान्स करत आहे. डान्स करताना दोघ ताल मिसळताना दिसत आहेत.


The Kapil Sharma शो सोडून 'Bigg Boss 16'मध्ये दिसणार 'हा' अभिनेता


पाहा व्हिडीओ - 



दरम्यान, शाहिदने व्हिडीओ शेअर करताना MJ in PJ असं कॅप्शन दिलंय. याचा अर्थ, पायजमा घालून नाचणे... शाहिद कपूरने आपल्या अप्रतिम डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. शाहिद आणि ईशानचा हा दमदार डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जातोय. या डान्स व्हिडिओला चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत.