`आयफा`त परफॉर्मन्स करणं शाहीदसाठी ठरलं एक `आव्हान`
दरवर्षीप्रमाणे यंदाही आयफा अवॉर्डची संध्याकाळ सिने-तारकांसाठी रोषणाईची ठरली.
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही आयफा अवॉर्डची संध्याकाळ सिने-तारकांसाठी रोषणाईची ठरली. बॉलीवूडच्या ताऱ्यांनी 'आयफा'च्या स्टेजवर आपल्या सादरीकरणांतून सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. याच दरम्यान शाहिद कपूरने त्याच्याच चित्रपटांतल्या गाण्यांवर परफॉर्मन्सही सादर केला. पण आयफाच्या स्टेजवरचं हा परफॉर्मन्स त्याला खूप महागात पडलाय.
ही बातमी वाचल्यानंतर शाहीदचं तुम्हाला कदाचित कौतुकही वाटेल. आयफा अॅवॉर्डच्या सादरीकरणाच्या वेळी अभिनेता शाहिद कपूरला दुखापत झाली होती.
'पद्मावती' या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान शाहिद बेशुद्ध झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सादरीकरणाच्या तयारीच्या वेळेस त्याच्या टाचेला दुखापत झाली. परंतु एवढी इजा होऊनही त्यानी आपला परफॉर्मन्स सादर करण्याचा निर्णय घेतला.
परंतु, त्याच्या तब्येतीसाठी हे खूप त्रासदायक ठरलं असतं. त्यामुळे, शाहीदनं थोडी विश्रांतीही घेतली. शिवाय परफॉर्मन्ससाठी त्याचे काही गाणी कमी करण्यात आले. शाहिदने गंदी बाद, बिस्मिल,साडी के फॉल सा या गाण्यांवर परफॉर्मन्स सादर केला. आयफाच्या १८ व्या सोहळयात शाहीद पत्नी मीरा कपूरसोबत दाखल झाला होता.
'उडता पंजाब' या चित्रपटात उत्कृष्ट अभिनयासाठी शाहिद कपूर आणि आलिया भट्टला शनिवारी उत्कृष्ट अभिनयाचा अॅवॉर्ड देण्यात आला. तर दिलजीत दोसांझला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याचा अॅवॉर्ड दिला गेला.