मुंबई : संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती'मध्ये साहस आणि सामर्थ्याचं प्रतिक असलेल्या महारावल रतन सिंहच्या भूमिकेत अभिनेता शाहिद कपूर प्रेक्षकांसमोर येणार आहे. शाहिदनं आपल्या या भूमिकेवर भलतीच मेहनत घेतल्याचं दिसतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या प्रत्येक भूमिका विचारपूर्वक साकारणाऱ्या शाहिदनं महारावल रतन सिंहच्या भूमिकेचा अनेक पैलुंनी अभ्यास केला. सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्वीचे राजे-रजवाडे हे युद्धावर जायचे त्यामुळे त्यांची धिप्पाड शरीरयष्टीही त्यांना अनुरूप असायची... त्यामुळे शाहिदला आपलं वजन वाढवण्यापेक्षा आपलं शरीरयष्टी पिळदार करण्यावर भर द्यावा लागला.


संजय लीला भन्साली आपल्या ऐतिहासिक भूमिकांवर खूप जाणीवपूर्वक काम करतात. त्यावेळचे राजपूत राजा खूप बलवान असायचे. त्यामुळे एका सामर्थ्यवान राजाच्या रूपात दिसण्यासाठी भन्साळींनी शाहिदला मस्क्युलर वजन वाढवायला सांगितले होते, असं समजतंय. 


प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा बहुप्रतिक्षित 'पद्मावती' चित्रपट १ डिसेंबर २०१७ ला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.