Shahid Kapoor च्या घरी `गुडन्यूज`, सेलिब्रेशनसाठी करीनाचं कुटुंब अभीनेत्याच्या घरी
Shahid Kapoor च्या घरी `गुडन्यूज, सेलिब्रेशनसाठी अभिनेत्याच्या EX Girlfriend चं कुटुंबही उपस्थितीत
मुंबई : एकटा शाहिद वगळला, तर ती हिंदी कलाजगतामध्ये इतर कोणालाही ओळखत नव्हती... पण, पाहता पाहता तिनं शाहिदशी लग्नगाठ बांधली आणि कपूर कुटुंबाचा एक अविभाज्य भाग झाली. ही 'ती' आहे, शाहिदची पत्नी, मीरा राजपूत. (shahid kapoor Mira rajput) मीरा आणि शाहिदनं कायमच त्यांच्या नात्यातून अनेक नव्या जोड्यांना Couple Goals दिले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांचीही केमिस्ट्री कायमच पाहायला मिळाली आहे.
पण, आता ही जोडी नव्या कारणामुळे चर्चेत आहे. शाहिद आणि मीराला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नुकताच शहिदने मुलगी मीशाचा सहावा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला.
यावेळी मीशाला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजर होत. यामध्ये शाहिदची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री करीना कपूरची ननंद सोहा अली खान देखील कुटुंबासोबत मिशाला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली.
सांगायचं झालं तर, शाहिद कपूर आणि कुणाल खेमू खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे सोहा आणि कुणाल त्यांची मुलगी इनायासोबत मिशाच्या किड्स पार्टीमध्ये पोहोचले.
सोहा अली खानला तिथे पाहिल्यानंतर सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांची मुले तैमूर आणि जेहही पार्टीत पोहोचले की नाही, अशी चर्चा नेटिझन्समध्ये रंगली होती. तर या पर्टीमध्ये तैमूर आणि जेह नव्हते.
शाहिद आणि मीराची मुलगी मीशा कपूर 26 ऑगस्टला 6 वर्षांची झाली. मीशा बॉलिवूडच्या क्यूट स्टार किड्सपैकी एक आहे. शुक्रवारी, मीरा आणि शाहिदने मुलगी मीशासाठी मुंबईत एक सुंदर वाढदिवसाची पार्टी ठेवली होती.
या पार्टीमध्ये नीलिमा अझीम, पंकज कपूर, सुप्रिया पाठक, करण जोहरची मुलं यश, रुही आणि सोहा अली खान-कुणाल खेमूची मुलगी इनाया खेमू यांच्यासह अनेक स्टार किड्सचा समावेश होता.