मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आणि पत्नी मिरा राजपूतला गोंडस मुलगा झाला आहे. मिराने आपल्या दुसऱ्या मुलाला बुधवारी 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.00 वाजता जन्म दिला आहे. मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात मिराने बाळाला जन्म दिला आहे. मिरा आणि बाळ दोघंही आता सुखरूप आहेत. 


शाहिद आणि मिराला मोठी दोन वर्षांची मिशा ही मुलगी आहे. 2015 मध्ये शाहिद - मिराचं लग्न झालं. आणि 2016 मध्ये मिशाचा जन्म झालं. आता 2 वर्षांनी या गोंडस मुलाचं घरात आगमन झालं आहे. दोन वर्षांची मिशा आता मोठी दीदी झाली आहे. एप्रिल 2018 मध्ये या दोघांनी दुसऱ्या बाळाची चाहुल सोशल मीडियावर शेअर केली. यावेळी मिशाच्या फोटोसोबत 'Big Sister' असं लिहून शाहिदने इंस्टाग्रामवर शेअर केलं होतं. 



मंगळवारी रात्री शाहिद आणि मिरा डिनर डेटला गेले होते. आणि बुधवारी सकाळी मिराला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. आणि सायंकाळी 4 वाजता तिने गोंडस मुलाला जन्म दिल्याची बातमी हाती आली.