मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या लग्झरी लाइफमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांच्याकडे अनेक कारचं कलेक्शन आहे.  या यादीत अभिनेता 'शाहिद कपूर' देखील मागे नाही. अलीकडेच, अभिनेता शाहिद कपूरने एक आलिशान कार Mercedes-Maybach S580 खरेदी केली आहे. ज्याचा व्हिडिओ त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता त्याची कार दाखवताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, शाहिद कपूर कारसमोर उभा आहे आणि त्यानंतर तो अचानक उडी मारतो आणि कारच्या आत बसतो आणि नंतर कार चालवतो. शाहिद कपूरने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'फॉलिंग बॅक बॅच'...


सेलिब्रिटींसोबतच त्याचे चाहतेही या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत. एका चाहत्याने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं की, 'मे बॅचला मे महिन्यात घेणं चांगलं झालं असतं. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलंय की, 'मला तुझी ड्रेक स्टाईल आवडली.' त्याच्या या व्हिडिओवर  यूजर्स सतत कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अभिनेत्याने खरेदी केलेली कार नुकतीच कंपनीने भारतीय मार्केटमध्ये सादर केली आहे. Mercedes-Maybach S580 ची एक्स-शोरूम किंमत 2.79 कोटी रुपये आहे तर या कारची ऑन-रोल किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे. शाहिदच्या कार कलेक्शनविषयी सांगायचं झालं तर, त्याच्याकडे Jaguar XKR – S, Range Rover Vogue, Mercedes – AMG S400, Porsche Cayenne GTS आणि Mercedes ML-Class सारख्या महागड्या कार आहेत.