मुंबई : अभिनेता शाहिद कपूर त्यांच्या आगामी 'कबीर सिंह' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याने अतिशय मेहनत घेतली आहे. चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत तयारी करण्यासाठी शाहिदने डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी बातचीत केली. शाहिदने त्याच्या चित्रपटातील भूमिकेसाठी विशेषज्ञांकडून माहिती घेतली आहे. या चित्रपटात शाहिद एका सर्जनची भूमिका साकारत आहे. या भूमिकेची तयारी करण्यासाठी शाहिदने रुग्णालयांमध्ये अनेक तास वेळ घालवला आहे. रुग्णालयातील प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिदने एका मुलाखतीत सांगितलं की, कबीर सिंह एक मोठे सर्जन आहेत. त्यांच्या क्षेत्रातील ते सर्वोत्तम आहेत. त्यामुळे या भूमिकेसाठी तसे हाव-भाव, त्यांचा अभ्यास करणं गरजंचं होतं. हा चित्रपट कबीर आणि प्रीतीची गोष्ट आहे. 




टी-सीरीज आणि सिने १ स्टूडिओ द्वारा प्रस्तुत 'कबीर सिंह' तेलुगू हिट चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, मुराद खेतानी, कृष्ण कुमार आणि अश्विन वर्दे आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन संदीप रेड्डी वंगा यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या २१ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.