मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) या जोडीकडे 'मोस्ट हॅपनिंग कपल' म्हणून पाहिलं जातं. काही वर्षांपूर्वी अनेक महिला चाहत्यांची मनं तोडत शाहिदनं मीराशी लग्न केलं आणि पाहता पाहता तिलाही चाहत्यांनी आपलंसं केलं. कलाजगताशी थेट संबंध नसतानाही शाहिदची पत्नी झाल्यानंतर मीरा बरीच बदलली. हल्ली तर ती मॉडेलिंग वगैरेही करताना दिसते. अशी ही मीरा प्रत्येक पावलावर शाहिदची साथ देताना दिसते. पण आता शाहिदला पत्नीची एक सवय बिलकूल आवडत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिद कपूरने नुकताच एक व्हिडीओ शेअर करून त्याच्या पत्नीची एक सवय उघड केली आहे. या व्हिडीओमध्ये शाहिद मीराच्या फोन वापरण्याच्या सवयीची खिल्ली उडवताना दिसत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मीराची नक्कल करत शाहिद खूपच फनी लूक बनवतो, जे पाहून तुम्हीही हसायला लागाल. याआधीही शाहिदने मीराच्या फोन वापरण्याच्या सवयीची अनेकदा खिल्ली उडवली आहे.


शाहिद कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, शाहिदचे दोन सिनेमे लवकरचं चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत, राज आणि डीके दिग्दर्शित 'फर्जी' सिनेमातीन शाहिद OTT वर पदार्पण करणार आहे. याशिवाय त्याच्याकडे अली अब्बास जफरचा 'ब्लडी डॅडी' सिनेमा देखील आहे.