मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या नवे-नवे घर खरेदी केले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच सोनम कपूर आणि आनंद आहूजा यांनी मुंबईमध्ये एक नवं घर खरेदी केलं होतं. यानंतर आता शाहीद कपूरने देखील मुंबईत एक नवं घर खरेदी केलं आहे. शाहीदने मुंबईमध्ये वरळीमध्ये घर खरेदी केलं आहे. घराची किंमत ऐकल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. कारण या घराची किंमत 56 कोटी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार या घराची किंमत 55 कोटी 60 लाख आहे. शाहीदचं हे घर 42 आणि 43 व्या माळ्यावर आहे. शाहीदने या घरासाठी 2 कोटी 91 लाखांची स्टँप ड्यूटी दिली आहे. शाहीदचं हे घर खूपचं अलिशान असल्याची चर्चा आहे.


शाहीद लवकरच या घरामध्ये शिफ्ट होणार आहे. शाहीद दुसऱ्यांदा वडील बनणार आहे. शाहीदची पत्नी मीरा सध्या प्रेग्नेंट आहे. शाहीद लवकरच बत्ती गुल मीटर चालू सिनेमामध्ये दिसणार आहे.