Shahid Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा 'कबीर सिंग' हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे. हा चित्रपट आपण कधीच विसरू शकत नाही. त्याचा ब्लॉकबस्टर ठरलेला हा चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच उत्सुकतेनं पाहतात. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे 'एनिमल' या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी यांनीच केला आहे. त्यांच्या 'कबीर सिंग' या चित्रपटाला अनेकांनी त्यावेळी विरोध केला होता. पण त्याला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादानं वेगळंच चित्र दाखवलं होतं. पण तुम्हाला माहितीये का शाहिद कपूरला हा चित्रपट करायचा नव्हता. मात्र, त्याची पत्नी मीरा राजपुतमुळे त्यानं या चित्रपटाला होकार दिला. याविषयी शाहिदनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. 


शाहिदनं दिला होता नकार....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिद कपूरनं 'पिंकव्हिला'ला ही मुलाखतीत शाहिद कपूरनं याविषयी खुलासा केला. 'माझी पहिली प्रतिक्रिया हिच होती की मुळीच नाही, मी हा चित्रपट करणार नाही. कारण ही व्यक्ती (संदीप रेड्डी वांगा) एक न्यूकमर आहे आणि त्यातही त्यानं खूप चांगलं काम केलं आहे. असं आहे की मला प्रेक्षकांनी मला कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहिलं आहे. त्यांच्या मनात माझी एक पर्सनॅलिटी आहे', असं शाहिद कपूर म्हणाला. 



शाहिद कूपर पुढे म्हणाला की 'तर दुसरीकडे नवीन कलाकार असेल तर असं होत की तुम्ही या अभिनेत्याला त्या भूमिकेत स्वीकारतात. कारण तुम्ही त्या व्यक्तीला पहिल्यांदा पाहत आहात. तुम्ही त्याच्यावर प्रेम करता आणि त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी आवडू लागतात. त्यानंतर तुम्हाला कळतं की ती व्यक्ती देखील परफेक्ट नाही. ती व्यक्ती देखील खराब चित्रपट करू शकते.'


हेही वाचा : कितीही गाजा-वाजा केला तरी 'जवान' पेक्षा 'गदर 2' ची कमाई जास्त, पाहा गणित!


शाहिद कपूरनं पुढे सांगितलं की 'मी इतकं सांगुन ते तिथेच संपवलं आणि मीराला सांगितलं की हे कारण आहे की मी चित्रपट नाही करणार. मी हा चित्रपट करायला नको.' त्यानंतर मीरानं त्यावर काय प्रतिक्रिया दिली याविषयी सांगितलं. 'ती माझ्याकडे पाहत राहिली आणि पाच मिनिटांनंतर म्हणाली की तू तुझं तोंड बंद ठेव आणि हा चित्रपट कर. हा तुझ्यासाठी योग्य चित्रपट आहे. मी तिला विचारलं- खरंच? तर ती म्हणाली, हो, लोकांना तुला लव्ह स्टोरीमध्ये पाहायला आवडतं. त्यांना तुला अशा भूमिकांमध्ये पाहणं आवडतं आणि यात तर दोन्ही आहेत. मला असं वाटतं की मी खूप स्वत: यावर उगाच जास्त विचार करत होतो. तिनं हे सगळं खूप सोपं ठेवलं होतं. पण मला याचा आनंद आहे की बरं झालं मी हा चित्रपट केला.' कबीर सिंग विषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट त्याच्या करिअरच्या दोन दशकांमध्ये सगळ्यात जास्त हीट हा चित्रपट ठरला होता. हा चित्रपट प्रेक्षकांनी आनंदानं पाहिला.