मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याच्या बहिणीच्या लग्नसोहळ्यानं सध्या संपूर्ण कलाजगत आणि चाहत्यांच्या वर्तुळाच्या नजरा वळवल्या आहेत. शाहिदची बहिण सनाह हिच्या लग्नासाठी तिची मावशी, ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह आणि त्यांचे पती नसिरुद्दीन शाह यांनीही हजेरी लावली. (shahid Kapoors sister wedding)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाआधीचे विधी पार पडत असतानाच या सेलिब्रिटी कुटुंबात असणारे नात्यांचे बंध यावेळी पाहायला मिळाले. जिथे रत्ना पाठक या आपल्या भाचीला कलीरे आणि चुडा भरताना दिसल्या. 


मागे नसिरुद्दीन शाह हेसुद्धा मोठ्या कौतुकानं हे क्षण पाहत होते. 


सनाहचे यावेळी सर्वजण लाड करत होते. तिच्या चेहऱ्यावर असणारा आनंद खूप काही सांगून गेला. भाऊ, बहिणी, वडील, आई, मावशी आणि इतर कुटुंबीयांनी तिच्या आनंदात भर टाकली होती. 




पंकज कपूर यांची दुसरी पत्नी, सुप्रिया पाठक यांची लेक म्हणजे सनाह. नात्यांमध्ये काही वर्षांपूर्वी आलेला दुरावा अनेक मैल दूर लोटत सध्या एकत्र आलेलं हे कुटुंब चांगलंच गाजतंय असं म्हणायला हरकत नाही.