मुंबई : बॉलिवू़ड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा एका नव्या छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. ही आनंदवार्ता काही दिवसांपूर्वी शाहिदने सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना दिली होती. अलिकडेच डिनर डेटवर जात असलेल्या या दोघांना स्पॉट करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळेस मीरा राजपूतने लाल रंगाचा टॉप आणि लूज पॅंट घातली होती. तर शाहिद कपूर शॉर्ट्समध्ये होता.नेहमी हातात हात घालून फिरणारी ही जोडी आता मात्र दूर दूर होती.



शाहिद मीरा हे दोघे २०१५ मध्ये विवाहबद्ध झाले असून त्यांना मिशा ही दोन वर्षांची मुलगी आहे. मीरा पुन्हा एकदा प्रेग्नेंट असून ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचे आगमन होईल. 



फ्रेंड्ससोबत डिनरला गेलेले शाहीद आणि मीरा. रेस्टोरेंटमधून बाहेर पडताच मीरा सरळ गाडीच्या दिशेने गेली तर शाहीद फ्रेंड बाहेर येण्याची वाट पाहत राहिला.



मीराने कॅमेऱ्याकडे अजिबात पाहिले देखील नाही. तर शाहिदने हसत, थम्स अप करत कॅमेऱ्यात पोज दिली.