मुंबई : शाहरूख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरूखची पत्नी गौरी खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सुहानाचा एक फोटो पोस्ट केला. यामध्ये सुहानाने अंगप्रदर्शन केल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. 


'मुस्लिम म्हणवण्याचा अधिकार नाही'



'सुहानाला स्वत:ला मुस्लिम म्हणवून घेण्याचा अधिकार नाही.



एका मुस्लिम मुलीने आपले शरीर नेहमी झाकून ठेवायला हवे.' असे ट्रोलर्सचे म्हणणे आहे. 


'सुहाना लवकर मोठं होण्याचा प्रयत्न करतेयस, थांब बाळा.' असा सल्लाही तिला दिला गेला आहे.



बॉलीवूडमध्ये एन्ट्री 


शाहरूख आणि गौरीची मुलगी सुहाना खान लवकरच बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. सध्या ती लंडनमध्ये शिक्षण घेतेय.