मुंबई : जवळपास 4 वर्षांनंतर अभिनेता शाहरुख खान यानं रुपेरी पडद्यावर एंट्री करण्याचा निर्धार केला. काही दिवसांनी हा अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निमित्त आहे ते म्हणजे त्याचा 'पठान' हा चित्रपट. सध्य़ा किंग खान याच चित्रपटाच्या कामांमध्ये व्यग्र असल्याचं दिसत आहे. (shah rukh khan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यग्र कामातूनही तो आपल्या चाहत्यांना आणि आजुबाजूला असणाऱ्या लोकांनाही तितकाच वेळही देताना दिसत आहे. 


शाहरुखसाठी त्याच्या जीवनात काही व्यक्ती अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं शक्य तितक्या वेळा तो या व्यक्तींसोबतही काही क्षण व्यतीत करतो. 


अशीच एक व्यक्ती, ज्याची त्याला दैनंदिन आयुष्यात बरीच मदत होते, तो म्हणजे त्याचा ड्रायवर. 


याच व्यक्तीसोबतच्या नात्याची एक झलक नुकतीच पाहायला मिळाली.


आगामी चित्रपटाच्या कामानिमित्त स्पेनला जायला निघालं असता विमानतळातून आत जाण्याआधी शाहरुखनं त्याच्या या वाहन चालकाला मिठी मारली, त्याला हात मिळवला. 


आपल्या मालकापासून दूर राहणं त्या चालकासाठी जितकं कठीण तितकंच या खास व्यक्तीपासून दूर जाणं शाहरुखलाही कठीण असावं हेच यावेळी पाहायला मिळालं. 



तिथे असणाऱ्या अनेकांनीच हे क्षण लगेचच कॅमेरामध्ये टीपले. यावेळी विमानतळावर असणाऱ्या जवानाशीही त्याचं एक अव्यक्त नातं दिसून आलं. 


किंग खानचं या सर्व लोकांसोबतं नातं आणि हे भावनिक क्षण बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाले आणि हा अभिनेत्याच्या चाहत्यांनी पुन्हा त्याच्याच नावाचा डंका वाजवला.