मुंबई : अभिनेता शाहरुख खान हा एक असा अभिनेता आहे ज्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. शाहरुखला मोठ्या स्क्रिनवर पाहण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. शाहरुख खानच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यात नेमकं काय सुरु हे जाणून घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं. नुकताच शाहरुखचे असे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत जे पाहून चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता शाहरुख खान एक चांगला अभिनेता होण्यासोबतच नेहमीच हा अभिनेता त्याच्या कुटूंबाची काळजी घेत असतो. मग त्याच्या मुलांचा कोणता प्रोजेक्ट असो किंवा मग अभिनेत्याच्या मुलांचा स्कूल इव्हेंट असो शाहरुख नेहमीच सगळ्याचा हिस्सा बनतो. नुकताच अभिनेत्याच्या लेकाच्या शाळेत एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला स्वत: शाहरुखने हजेरी लावली होती. ज्याचे काही फोटो शाहरुख खानच्या फॅन पेजवरुन शेअर करण्यात आले आहेत. समोर आलेल्या या फोटोत शाहरुखचं बोलणं शाळेतील मुलं ऐकताना दिसत आहेत. तर दुसरीकडे अबराम स्टेजवर गिटार वाजवताना खूपच क्यूट दिसत आहे.


अबरामच्या स्कूल इव्हेंटमध्ये शाहरुख खान पोहचला
शाहरुख खानचे खूप सारे फॅनपेज आहेत. जे त्यांचे फोटो शेअर करत आहेत. आजही एका फॅन पेजने पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. शाहरुखला अबरामच्या शाळेत स्पेशल गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे.  या दरम्यान भरपूरसाऱ्या एक्टिविटीमध्ये शाहरुखसोबत मुलांनीही भाग घेतला होता. समोर आलेल्या फोटोंमध्ये शाहरुख मुलांसोबत गप्पा मारताना दिसत आहे.  तर दुसऱ्या फोटोत सगळे एकत्र बसून पोज देताना दिसत आहेत.



अबरामचा क्यूट फोटो होतोय व्हायरल
शाहरुखसारखी त्याची मुलांनाबही चाहते पसंती देतात. अबराब हा असा स्टारकिड आहे जो सगळ्यात जास्त लोकप्रिय स्टारकिडपैकी एक आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोत तो खूप लक्षकेंद्रित करुन गिटार वाजवताना दिसत आहे. लोकांना त्याचा हा अंदाज खूप क्यूट वाटत आहे. याआधीही बऱ्याचदा अबरामचे शाळेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


शाहरुखला अबरामसोबत वेळ घालवायला कायमच आवडतं.  काही दिवसांपुर्वी अभिनेता धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल च्या वार्षिक दिनाच्या कार्यक्रमात पत्नी गौरी खानसोबत दिसला होता. आराध्या बच्चन देखील त्याच शाळेत शिकते आणि म्हणूनच तिचंही संपूर्ण कुटुंब, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन तिला चिअर अप करण्यासाठी तिथे आले होते.