मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर पहिल्यांदा बहिण सुहाना खानसोबत आयपीएल ऑक्शन दरम्यान दिसला. आर्यन आणि सुहानाच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. नुकताचं सुहानाला एक हॉटेलबाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी सुहाना तिच्या आयुष्यातील खास व्यक्तींसोबत दिसली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुहानाच्या आयुष्यातील खास व्यक्ती तिच्या मैत्रिणी अभिनेत्री अनन्या पांडे आणि शनाया कपूर... तिघी लहानपणा पासून चांगल्या मैत्रिणी आहे. अनेकवेळा तिघी एकत्र दिसतात. त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आता देखील एकत्र स्पॉट करण्यात आलं. यावेळी त्या एकत्र हॉटेलमध्ये डिनरसाठी गेल्या होत्या. पण यावेळी सुहाना, अनन्या, शनाया यांच्यासोबत खुशी कपूर देखील होती. 


त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सुहाना खान बद्दल सांगायचं झालं तर ती लवकरचं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.