Shahrukh Khan Deepika Padukone Upcoming Movie Pathaan censor demands : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाविषयी नेहमीच वेगवेगळ्या कमेंट करण्या येतात. कधी या चित्रपटाचं नाव बदलण्यात येईल अशी तर कधी असे म्हटले जाते की चित्रपटातील 'बेशरम रंग' (Besharam Rang) या गाण्यातील अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) बिकीनीचा रंग बदलण्यात येईल. दरम्यान, आता या चित्रपटाविषयी मोठी बातमी समोर येत आहे की चित्रपटावर सेंसर बोर्डानं काही कट्स सांगितले आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) नं शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटात काही बदल करण्यास सुचवले होते. त्यात कॉन्ट्रोवर्सियल सॉन्ग 'बेशरम रंग' मध्ये बदलाव करण्यास सांगितले आहे. यावेळी डायलॉग बदलण्यासोबत सीन्समध्ये बदल पर्यंत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या चित्रपटासाठी सेंसर बोर्डानं 10 पेक्षा जास्त कट सांगितले आहेत. 


चित्रपटात कोणते कट सांगितले आहेत तर कोणत्या शब्दांना पर्यायी शब्द दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड हंगामानं दिलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेन्सॉर बोर्डाने चित्रपट पाहिल्यानंतर निर्मात्यांना काही कट आणि काही बदल सुचवले आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीला कर्नल लुथरा यांच्या डायलॉगमधून 'रॉ' हा शब्द काढून त्या जागी ‘हमारे’ या शब्दाचा वापर करण्यास सांगितले आहे. यासोबतच आणखी एका डायलॉगमध्ये स्वस्त स्कॉच मिळाली नाही, तर स्कॉचऐवजी ड्रिंक्स वापरण्यास सांगितले आहे. तर दुसऱ्या डायलॉगमध्ये रशियाचा संदर्भ काढून टाकण्यास सांगितले आहे. इतर डायलॉग्समध्ये, मिसेस भारतमाता ऐवजी हमारी भारमाता असे करण्यास सांगितले आहे. 


बेशरम गाण्यातून कोणत्या गोष्टी काढून टाकण्यास सांगितले आहे. 


रिपोर्ट्सनुसार, सेंसर बोर्डानं या गाण्यातील बोल्ड, क्लोजप, साइड पोज आणि बहुत तंग किया या गाण्याच्या लाइन दरम्यान, दीपिकानं केलेले सेन्शुअल डान्स स्टेप काढून टाकण्यास सांगितले आहे. तर त्याजागी शोभतील अशा स्टेप करण्यास सांगितले आहे. तर आता सगळ्यांना प्रश्न आहे की दीपिकाच्या भगव्या बिकीनीवर आक्षेप घेतल्यानंतर त्यावर सेंसर बोर्डानं काय निर्णय घेतला आहे. दरम्यान, हे सगळे बदल केल्यानंतर एडिट केल्यानंतर रिव्हाइज कॉपी पुन्हा पाठवण्यास सांगितले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : Rashmika Mandanna सोबत Vijay Deverakonda एकत्र? Instagram Live मुळे पोलखोल


दरम्यान, दीपिकाच्या भगव्या बिकीणीवर चांगलाच वाद सुरु होता. यावेळी हे संपूर्ण प्रकरणावर राजकीय लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. दीपिकाच्या भगव्या बिकीनीमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशा धमक्या त्यांना देण्यात आल्या होत्या. या प्रकरणावर निर्माता यशराज फिल्म्सनं काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. दरम्यान, पठाण चित्रपटाचा ट्रेलर हा 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. तर शाहरुखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत.