शाहरूखने व्यक्त केली वडिल असल्याची `वाईट बाजू` ...
शाहरूख खान आणि त्याची मुलं सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असतात.
मुंबई : शाहरूख खान आणि त्याची मुलं सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असतात.
शाहरूखही त्याच्या मुलांप्रमाणेच खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असतो. असाच एक खास फोटो नुकताच शाहरूखने शेअर केला आहे. पण त्यावर लिहलेल्या कॅप्शनने हा फोटो खास ठरला आहे.
काय आहे फोटो
नुकताच शाहरूखचा मुलगा अबरामचा शाळेतील अॅन्युएल डे झाला. या दिवसा निमित्त शाहरूखची दोन्ही मुलं सहभागी झाली होती.
सुहानासोबतचा अबरामचा फोटो शेअर करताना शाहरूख खानने खास कॅप्शन लिहले होते. शाहरूख म्हणतो, ' बाबा होण्याची एक वाईट बाजू म्हणजे तुम्ही सतत फोटो क्लिक करत असतात. पण ते मुलांसोबत नसतात. पण एडिड्समुळे तुम्ही वाचता ...'
सुहाना सोबत अबराम
सुहाना खान ही शाहरूखप्रमाणेच अभिनेत्री होणार असल्याची इच्छा बाळगून आहे. सुहानाचे फोटोदेखील सोशल मीडियामध्ये हीट आहेत. शाहरूखचा मुलगा आयर्न देखील त्याची कारबन कॉपी दिसत असल्याने त्याचीही बॉलिवूडमध्ये एन्ट्री होणार का ? हा प्रश्न आहे.