मुंबई : सध्या बॉलिवूमध्ये सिनेमांच्या रिलीजची रांग लागली आहे. एका पेक्षा एक सिनेमा रिलीज होण्यासाठी सज्ज आहेत. लवकरच शाहरुख खानचा पठान देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच शाहरुखने त्याच्या 57वा वाढदिवस साजरा केला वाढदिवशीच त्याने त्याच्या आगामी सिनेमाचा टीझरचं अनावरण केलं. ज्याला घेवून काही लोकं खुश नाही आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, हा सिनेमा हॉलिवूची कॉपी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 शाहरुखचा आगामी चित्रपट 'पठाण' ही एका भारतीय गुप्तहेराची कथा आहे. चार वर्षांहून अधिक काळानंतर अभिनेत्यासाठी तीन चित्रपटांपैकी हाच त्याचा पहिला चित्रपट आहे. याआधी, शाहरुख शेवटचा 2018 मध्ये आलेल्या 'झिरो' चित्रपटात दिसला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगलीच फ्लॉप झाला होता.


 चित्रपटाला कॉपी म्हटलं
सोशल मीडियावर अनेक युजर्सनी टीझरबद्दल चर्चा केली. एका नेटिझनने 'पठाण' मधील एका सीनची तुलना प्रभासच्या 2018 च्या 'साहो' चित्रपटाशी केली. सीनमध्ये शाहरुख जेटपॅकचा उपयोग करुन उडताना दिसत आहे.


सोशल मीडियावर चित्रपटाला केलं ट्रोल 
एका सोशल मीडिया युजर्सने 2005 च्या 'दस' चित्रपटातील एका सीनकडे लक्ष वेधलं, ज्यामध्ये झायेद खानने बाईक चालवत असताना टँकचा स्फोट करण्यासाठी ग्रेनेडचा वापर केला. तर कोणीतरी हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' चित्रपटाची तुलना केली आणि फोटो शेअर केले. एकाने 'पठाण'मध्ये वापरलेल्या व्हीएफएक्सबद्दल कमेंट केली आणि त्याला लज्जास्पद म्हटलं, तर दुसऱ्याने हा हॉलिवूड क्राऊड फंडेड बी ग्रेड अॅक्शन फिल्म असल्याचं म्हटलं.


एका युजर्सने सांगितलं की, हा टीझर पाहिल्यानंतर 'कॅप्टन अमेरिका', 'डाय अनदर डे' आणि 'बीस्ट अँड विवेगम' पाहिल्यासारखं वाटलं. भारतातील आघाडीच्या स्टुडिओ समूह यशराज फिल्म्सद्वारे निर्मित, 'पठाण' 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.